थंड हवेच्या महाबळेश्वरमध्ये राजकीय रणधुमाळी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एंट्रीमुळे निवडणूक तापली

थंड हवेच्या महाबळेश्वरमध्ये राजकीय रणधुमाळी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एंट्रीमुळे निवडणूक तापली

कुंभरोशी प्रतिनिधी 

महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आता अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली असून थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यात राजकारणाचे वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या दौऱ्याकडे केंद्रित झाले आहे. कुंभरोशी आणि तळदेव गटातील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाबळेश्वर तालुक्यात दाखल होत असून त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे.

कुंभरोशी येथील जननी माता मंदिर परिसरात भव्य प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून उद्या दुपारी तीन वाजता हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी तब्बल १०५ गावांतून शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचायत समिती निवडणुकीसाठी कुंभरोशी गणातून संजय मोरे, जिल्हा परिषदेसाठी तळदेव गटातून अजित संकपाळ, तर पंचायत समितीसाठी तळदेव गणातून संजय शेलार हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी थेट उपमुख्यमंत्री मैदानात उतरल्याने विरोधकांवर राजकीय दबाव वाढताना दिसत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून प्रचार यंत्रणा पूर्ण ताकदीने सक्रिय झाली आहे. प्रत्येक गट, गण आणि गावागावात निवडणुकीची चर्चा रंगली असून या प्रचार दौऱ्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुका सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून येत्या काही दिवसांत प्रचार अधिकच आक्रमक आणि तीव्र होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl