मकर संक्रांतीनिमित्त कुडल संगम पीठाचे जगद्गुरु महाबळेश्वरमध्ये; पंचगंगा जलपूजा व ‘बसव कृषी पुरस्काराची’ घोषणा

मकर संक्रांतीनिमित्त कुडल संगम पीठाचे जगद्गुरु महाबळेश्वरमध्ये; पंचगंगा जलपूजा व ‘बसव कृषी पुरस्काराची’ घोषणा

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर, ता. १५ — कर्नाटकातील कुडल संगम येथील लिंगायत समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र आणि जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांचे समाधीस्थान असलेल्या कुडल संगम पीठाचे प्रथम जगद्गुरु श्री श्री श्री बसवजय मृत्युंजय महास्वामीजी पंचम साली यांनी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे समक्ष भेट दिली. मकर संक्रांतीनिमित्त कुडल संगम येथे होणाऱ्या विशेष पूजेसाठी पंचगंगेच्या पवित्र जलाचे संकलन करण्यासाठी ही भेट देण्यात आल्याची माहिती जगद्गुरुंनी दिली.

लिंगायत समाजात कुडल संगम या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व असून, याच ठिकाणी लिंगायत समाजाचे संस्थापक जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांचे समाधीस्थान आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी १८ वर्षांपूर्वी श्री श्री श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी पंचम साली यांनी ‘लिंगायत पंचम जगद्गुरु महापीठा’ची स्थापना केली आहे. ‘काम हेच कैलासाला जाण्याचा मार्ग’ या महात्मा बसवेश्वरांच्या ब्रीदवाक्याचा आधार घेत शेतकरी प्रबोधन, शाश्वत विकास, जलसंधारण व सामाजिक जागृतीसाठी या महापीठाच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

२०११ साली स्थापन झालेल्या या महापीठाच्या वतीने दरवर्षी मकर संक्रांतीच्या शुभदिनानिमित्त देशातील शेतकऱ्यांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. याच अनुषंगाने पंचम म्हणजे कृष्णा, भीमा, मलप्रभा, तुंगभद्रा व घटप्रभा या पाच नद्यांचे पवित्र जल संकलित करून कुडल संगम येथे विशेष पूजा करण्यात येणार असल्याची माहिती जगद्गुरुंनी दिली.

महाबळेश्वर येथे नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत लिंगायत समाजाच्या सौ. स्मिता पाटील या नगरसेविका म्हणून निवडून आल्याची माहिती मिळताच जगद्गुरुंनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. स्मिता पाटील, ॲड. संजय जंगम, विमलताई पार्टे यांचा सन्मान करून त्यांना आशीर्वाद देण्यात आले. तसेच पाटील घराण्याच्या अनुसयाबाई पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना जगद्गुरु श्री श्री श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी २०२६ सालचा प्रतिष्ठेचा ‘बसव कृषी पुरस्कार’ हा शेतकऱ्यांसाठी अहोरात्र कार्य करणारे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास विजयपूर येथील लिंगायत समाजाचे अध्यक्ष बी. एम. पाटील, प्रसारमाध्यम प्रतिनिधी हिराअण्णा आवटी, श्रीशैल पाटील, कुमार गोरख पाटील, शरण बसवा पाटील उपस्थित होते. तसेच आर. के. पाटील उद्योग समूहाचे दिलीप पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, सुनील पाटील, तरुण उद्योजक धिरज व अमेय पाटील यांच्यासह गिरीश नायडू, प्रविण कदम, राजेश कुंभारदरे, प्रमोद लोखंडे आदी मान्यवरांनीही उपस्थिती लावली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl