प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा : विजय ढमाळ चेअरमन, नितीन फरांदे व्हाइस चेअरमनपदी सर्वानुमते निवड
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा : विजय ढमाळ चेअरमन, नितीन फरांदे व्हाइस चेअरमनपदी सर्वानुमते निवड
संतोष मालुसरे,
सातारा प्रतिनिधी—
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा यांच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाच्या निवडी जाहीर झाल्या असून, चेअरमनपदी खंडाळा येथील श्री. विजय ढमाळ तर व्हाइस चेअरमनपदी वाई येथील श्री. नितीन फरांदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ही निवड महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते श्री. उदय शिंदे आणि प्राथमिक शिक्षक संघाचे नेते श्री. सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
निवड जाहीर होताच शिक्षक बांधवांमध्ये समाधानाची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. विश्वंभर रणनवरे, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत यादव, महेंद्र जानुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बँकेचे माजी चेअरमन श्री. किरण यादव, नवनाथ जाधव, पुष्पलता बोबडे, माजी व्हाइस चेअरमन श्री. सुरेश पवार, विजय बनसोडे, संजीवन जगदाळे यांच्यासह बँकेचे संचालक विशाल कणसे, नितीन शिर्के, तानाजी कुंभार, नितीन काळे, संजय संकपाळ, विजय शिर्के, नितीन राजे, राजेंद्र बोराटे, शशिकांत सोनवलकर, निशा मुळीक, ज्ञानबा ढापरे, शहाजी खाडे हे सर्व उपस्थित होते.
या वेळी नवनिर्वाचित चेअरमन श्री. विजय ढमाळ आणि व्हाइस चेअरमन श्री. नितीन फरांदे यांनी उपस्थितांचे आभार मानत, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या माध्यमातून शिक्षकांच्या आर्थिक गरजा, हितसंबंध आणि विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी पारदर्शक, शिस्तबद्ध आणि विकासाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षक वर्गाच्या हितासाठी बँकेची सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि विश्वासार्ह करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निवडीमुळे प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा यांच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी भावना यावेळी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment