साडेचार कोटींच्या नुतनीकरणावर प्रश्नचिन्ह; उद्घाटनाआधीच पेटिट लायब्ररीचा दरवाजा निखळला

साडेचार कोटींच्या नुतनीकरणावर प्रश्नचिन्ह; उद्घाटनाआधीच पेटिट लायब्ररीचा दरवाजा निखळला

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर नगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील सी.एस. क्रमांक ५४७ येथील हेरिटेज यादीतील ऐतिहासिक दिनशा बोमनजी पेटिट लायब्ररी या मिळकतीच्या नुतनीकरणासाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र एवढ्या मोठ्या निधीतून करण्यात आलेल्या कामाच्या दर्जावर उद्घाटनापूर्वीच शंका उपस्थित झाली आहे. लायब्ररी परिसरात दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेल्या शौचालयाचा एक दरवाजा अल्पावधीतच निखळून पडल्याची घटना समोर आली असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शासनाचा व नगरपालिकेचा पैसा वारेमाप खर्च करूनही प्रत्यक्ष कामाची अवस्था अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हेरिटेज वास्तूच्या नुतनीकरणासाठी खर्च झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी नेमका कुठे वापरला गेला, असा सवाल उपस्थित होत आहे. उद्घाटनाआधीच जर अशी स्थिती असेल, तर भविष्यात या कामाची टिकाऊपणा आणि सुरक्षितता कशी राहणार, याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. विशेष म्हणजे दिव्यांगांसाठी उभारलेल्या सुविधेचीच अशी अवस्था असल्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणात ठेकेदार सवानी कंपनीसह महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, मुख्यलिपिक व बांधकाम अभियंता यांची जबाबदारी निश्चित करण्याची जोरदार मागणी होत आहे. संबंधित कामाची सखोल तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच निकृष्ट कामाची चौकशी करून सार्वजनिक निधीचा हिशेब द्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर दर्जेदार काम होत नसेल, तर हे अत्यंत गंभीर असून नगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चित्र सध्या महाबळेश्वरमध्ये दिसून येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl