कुंभरोशी गणात राष्ट्रवादीचा विकासाचा निर्धार; सचिन श्रीरंग उतेकर यांची उमेदवारी जाहीर, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
कुंभरोशी गणात राष्ट्रवादीचा विकासाचा निर्धार; सचिन श्रीरंग उतेकर यांची उमेदवारी जाहीर, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
कुंभरोशी प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सह्याद्री उद्योग समूहाचे सचिन श्रीरंग उतेकर यांची पंचायत समिती सदस्य पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून या निर्णयामुळे संपूर्ण गणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी जाहीर होताच शेतकरी, युवक, महिला, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उतेकर यांना जाहीर पाठिंबा देत बदलाची अपेक्षा व्यक्त केली आहे. उद्या होणाऱ्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमासाठी कुंभारोशी गणात मोठ्या जनसागराचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभारोशी गणामध्ये विकासाचा झंझावात उभा करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या विकासाच्या वाटचालीत राजेंद्र शेठ राजपुरे यांची भक्कम साथ आणि संजूबाबा गायकवाड यांचे सक्रिय सहकार्य लाभणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था तसेच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी या मूलभूत प्रश्नांवर ठोस आणि परिणामकारक काम करण्याचा विश्वास सचिन उतेकर यांनी नागरिकांना दिला आहे.
सह्याद्री उद्योग समूहाचे प्रमुख असलेले सचिन उतेकर हे मनमिळावू, मितभाषी आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सर्व स्तरांतील कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून सामाजिक आणि विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी लोकांशी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. याच पार्श्वभूमीवर कुंभरोशी गणातील जनतेचा ठाम पाठिंबा त्यांच्या पाठीशी उभा राहताना दिसत असून येणारी निवडणूक ही विकास विरुद्ध दुर्लक्ष अशी ठरणार असल्याची चर्चा सध्या संपूर्ण गणात आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Comments
Post a Comment