हरोशी गावाचा एकमुखी कौल; विकासाच्या विश्वासावर सचिन उतेकर यांना जाहीर पाठिंबा

हरोशी गावाचा एकमुखी कौल; विकासाच्या विश्वासावर सचिन उतेकर यांना जाहीर पाठिंबा

कुंभरोशी प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील हरोशी गावातून पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन उतेकर यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. हरोशी गावचे सुपुत्र असलेल्या सचिन उतेकर यांच्या सामाजिक बांधिलकीला आणि विकासाभिमुख कार्याला दाद देत गावकऱ्यांनी एकजुटीने त्यांना साथ देण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

सचिन उतेकर यांच्या पत्नी वैशाली सचिन उतेकर या जावली–हरोशी–दरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राहिल्या असून त्यांच्या कार्यकाळात हरोशीसह परिसरातील गावांमध्ये भरीव विकासकामे झाली. बंदिस्त गटार व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रॅव्हिटी पाईपलाईनद्वारे विहिरीपर्यंत पाणी नेण्याचे पूर्ण काम, जावली, दरे व हरोशी येथे शाळेच्या खोल्यांची उभारणी, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, संरक्षण भिंती, समाजमंदिरे आदी कामांमुळे गावांच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. विकासाबरोबरच गावातील सामाजिक सलोखा आणि एकजूट अबाधित ठेवण्याचा प्रयत्नही त्यांच्या कारकिर्दीत सातत्याने करण्यात आला.

सचिन उतेकर यांचे सहकार्य गावाला कायमच मिळत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. युवकांनी व्यावसायिक भूमिका घ्यावी, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात यासाठी त्यांचे मार्गदर्शन सुरू असते. शेतकऱ्यांना विशेषतः स्ट्रॉबेरी शेती करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकरी वर्गातही सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करून हरोशी गावाने सचिन उतेकर यांना एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

या निर्णयावेळी गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील सक्षम, विश्वासार्ह नेतृत्वासाठी सचिन उतेकर यांनाच साथ देणार असल्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl