कशेडी घाटात पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी; एक लेन पूर्ण बंद, सुदैवाने जीवितहानी टळली

कशेडी घाटात पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी; एक लेन पूर्ण बंद, सुदैवाने जीवितहानी टळली

प्रकाश कदम,

पोलादपूर प्रतिनिधी –

मुंबई–गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी सकाळी पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातामुळे महामार्गाची एक लेन पूर्णपणे बंद झाली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कंटेनर चालक राम आचल मिंद (रा. उत्तर प्रदेश) हे आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एम.एच. ४३ जी.ई. २२४४ घेऊन लोटे येथून भिवंडी वाडा येथे जात होते. मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना पोलादपूर नजीक कशेडी घाटातील चोळई गावाच्या हद्दीत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. अपघातानंतर कंटेनरमधील पेप्सीच्या बाटल्या महामार्गावर सर्वत्र विखुरल्या गेल्या असून कंटेनर पूर्णपणे रस्त्यावर आडवा पडल्याने एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंढे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्ग पोलीसही तत्काळ दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वाहतूक पोलादपूर–खेड दिशेने जाणाऱ्या एकाच लेनवर वळवण्यात आली असून त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, महामार्गावर विखुरलेल्या पेप्सीच्या बाटल्या बाजूला करण्याचे काम सुरू असून क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर हटवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. कंटेनर हटविल्यानंतर बंद असलेली लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl