महाबळेश्वर तालुक्यात ७०० हून अधिक गरजू महिलांना अन्नधान्य किटचे वितरण; स्व. क्लारा जवाहर कौल यांच्या स्मरणार्थ समाजसेवेचा आदर्श उपक्रम

महाबळेश्वर तालुक्यात ७०० हून अधिक गरजू महिलांना अन्नधान्य किटचे वितरण; स्व. क्लारा जवाहर कौल यांच्या स्मरणार्थ समाजसेवेचा आदर्श उपक्रम

महाबळेश्वर प्रतिनिधी , दि. ०१ जानेवारी :

 महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम व डोंगरी भागात वास्तव्यास असलेल्या गरजू महिलांसाठी नववर्षाच्या सुरुवातीलाच दिलासादायक मदतीचा हात देण्यात आला. चिल्ड्रन वेल्फेअर सेंटरच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती क्लारा जवाहर कौल यांच्या स्मरणार्थ मुंबई येथील शिक्षणमहर्षी प्रा. अजय कौल सर यांच्या माध्यमातून आयोजित या सामाजिक उपक्रमात महाबळेश्वर तालुक्यातील ७०० हून अधिक गोरगरीब व गरजू महिलांना अन्नधान्य किटचे मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनीलशेठ शिंदे यांच्यासह नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध दिव्यांग उद्योजक डॉ. भावेशभाई भाटिया यांनी स्व. क्लारा कौल यांच्या स्मरणार्थ राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. आईच्या स्मरणार्थ गेली अनेक वर्षे प्रा. अजय कौल सर दुर्गम भागातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवत असून त्यांच्या कार्यातून समाजाप्रती असलेली तळमळ स्पष्टपणे दिसून येते, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सुनीलशेठ शिंदे, प्रा. अजय कौल, प्रशांत काशीद, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर, रमेशभाई कौल, मुंबईचे माजी नगरसेवक याकूबभाई मेमन तसेच नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. क्लारा जवाहर कौल यांच्या प्रतिमेस नगराध्यक्ष सुनीलशेठ शिंदे व प्रा. अजय कौल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत झाले. प्रस्तावना शिरीष गांधी यांनी मांडत प्रा. अजय कौल सर गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. वनरक्षक व कवी दत्तात्रय कदम यांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी कविता सादर केली, ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. यशवंत घाडगे, माजी नगरसेवक याकूबभाई मेमन यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. डॉ. भावेशभाई भाटिया यांनी आपल्या खास शेरोशायरीच्या शैलीत उपस्थितांची मने जिंकली, तर नगराध्यक्ष सुनीलशेठ शिंदे यांनी प्रा. अजय कौल यांच्या दातृत्वाचे व समाजकार्याचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अखेरीस नगराध्यक्ष सुनीलशेठ शिंदे, प्रा. अजय कौल, प्रशांत काशीद यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाबळेश्वर व परिसरातील हॉटेल उद्योगात काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच विविध दुर्गम भागातील सुमारे ७०० हून अधिक गरजू महिलांना अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले. एकही गरजू महिला मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. याच उपक्रमाचा भाग म्हणून मागील चार-पाच दिवसांत महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात रस्ते काम करणाऱ्या गरजू मजूर वर्गाला प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाचशेहून अधिक ब्लँकेट्सचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक साळुंखे यांनी केले, तर आभार अजय आखाडे यांनी मानले. या उपक्रमास नवनिर्वाचित नगरसेवक अॅड. संजय जंगम, रोहित ढेबे, राजूभाई नालबंद, संतोष आखाडे, स्मिता पाटील, पल्लवी कोंढाळकर, विद्या शरद बावळेकर, शबाना अल्ताफ मानकर, नीता झाडे, अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन शरद बावळेकर, संचालक सतीश ओंबळे, इनरव्हील क्लबच्या पीडीसी रोहिणी वैद्य, सविता पल्लोड, लीलाताई शिंदे, उषाताई ओंबळे, सुनील पाटील, दिलावर गिलानी, महेश भुजबळ, सुरेखा देवकर, वर्षा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय कौल मित्र परिवार, चिल्ड्रन वेल्फेअर सेंटरचे सदस्य, एकता मंच मुंबई तसेच महाबळेश्वर येथील वनरक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl