चर्मकार समाजाची एकजूट निर्णायक ठरली; सुनील शिंदे यांचा विजयी जल्लोष, समाजबांधवांसह क्षेत्र महाबळेश्वर येथे दर्शन
चर्मकार समाजाची एकजूट निर्णायक ठरली; सुनील शिंदे यांचा विजयी जल्लोष, समाजबांधवांसह क्षेत्र महाबळेश्वर येथे दर्शन
महाबळेश्वर प्रतिनिधी , दि. २१ —
महाबळेश्वर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर चर्मकार समाजाने दिलेला शब्द खरा ठरवत विजयाच्या जल्लोषात महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करून सुनील शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्धार चर्मकार समाजाने केला होता. या निर्धारानुसार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मतदान करत सुनील शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करण्यात मोलाचे योगदान दिले.
विजयानंतर आनंदोत्सवाच्या वातावरणात चर्मकार समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव सुनील शिंदे यांच्यासह क्षेत्र महाबळेश्वर येथे दर्शनासाठी गेले. यावेळी नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार सुनील शिंदे यांनी समाजबांधवांसोबत महाबळेश्वराचे दर्शन घेतले. संपूर्ण परिसरात विजयाचा उत्साह, जल्लोष आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
निवडणूक काळात चर्मकार समाजाने दाखवलेली एकजूट, शिस्तबद्ध प्रचार आणि मतदानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात निर्णायक भूमिका बजावल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती. समाजाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल सुनील शिंदे यांनी आभार मानत, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी नितीन साळुंखे, विजय साळुंखे, शशिकांत कारंडे, सागर सोनवणे, नितीन काळे, अनिल साळुंखे यांच्यासह चर्मकार समाजातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विजयानंतरचा हा दर्शन सोहळा व जल्लोष महाबळेश्वरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.
Comments
Post a Comment