“गड आला पण सिंह गेला” नाट्यसादरीकरणातून गवडी शाळेचा लौकिक; तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे मानांकन

“गड आला पण सिंह गेला” नाट्यसादरीकरणातून गवडी शाळेचा लौकिक; तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे मानांकन

मेढा प्रतिनिधी –

जावली तालुक्यातील गवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ऐतिहासिक नाट्यसादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या शैक्षणिक व सांस्कृतिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे. “गड आला पण सिंह गेला” या इतिहासप्रेरित आणि भावनिक आशय असलेल्या नाटकाच्या प्रभावी सादरीकरणातून गवडी शाळेने तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले असून या यशामुळे शाळेचा तसेच संपूर्ण गावाचा नावलौकिक तालुकास्तरावर उंचावला आहे.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नाटकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वराज्याच्या मूल्यांची आणि त्यागाची प्रभावी मांडणी करण्यात आली. प्रत्येक प्रसंगात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवादातील स्पष्टता, अभिनयातील सहजता आणि संघभावना ठळकपणे दिसून आली. भावनिक प्रसंगांनी प्रेक्षकांना अंतर्मुख केले तर युद्धप्रसंगांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. संपूर्ण सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री. संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मिलन मुळे, केंद्रप्रमुख सौ. वंदना गंगावणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश गणपत गोळे तसेच मुख्याध्यापक श्री. किरण महादेव ढेबे यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देत नाट्यसादरीकरणासाठी सातत्याने मार्गदर्शन करणाऱ्या सौ. नेहा जाधव आणि सौ. मंगल शेलार यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक करण्यात आले.

गवडी शाळेच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ मंडळ गवडी आणि श्री. चवणेश्वर प्रतिष्ठाण गवडी यांच्या वतीनेही शाळा, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणारी गवडी शाळा तालुक्यासाठी आदर्श ठरत असून भविष्यातही अशीच भरीव यश मिळावीत, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl