ब्रेकिंग न्यूज : महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक — प्रभाग क्रमांक एकमधून राजू नालबंद आणि विद्या बावळेकर नगरसेवक म्हणून विजयी
ब्रेकिंग न्यूज : महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक — प्रभाग क्रमांक एकमधून राजू नालबंद आणि विद्या बावळेकर नगरसेवक म्हणून विजयी
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणूक मतमोजणीचा निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक एकमधून नगरसेवक पदासाठी राजू नालबंद आणि विद्या बावळेकर यांनी विजय मिळवला आहे. मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक एकमध्ये समर्थकांनी आनंद व्यक्त केला असून फटाक्यांच्या आतषबाजीसह विजयाचा जल्लोष करण्यात आला.
या विजयामुळे महाबळेश्वर नगरपालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडून प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी प्रश्न आणि विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त केली जात आहे. नगरपालिकेच्या एकूण निकालांकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment