पांचगणीतील आंतरराष्ट्रीय पर्वत दिन उत्साहात; आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अपेक्षित

पांचगणीतील आंतरराष्ट्रीय पर्वत दिन उत्साहात; आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अपेक्षित

पाचगणी प्रतिनिधी –

पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि ‘हिल्दारी’ यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त भव्य आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व शाळांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी त्यांच्या शाळांनी विशेष प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पालिका आणि आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये हिल स्टेशनच्या संरक्षण, संवर्धन आणि जबाबदार पर्यावरण वर्तनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. स्वच्छ, हिरवे आणि जबाबदार पांचगणी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सृजनशील कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळावे, हा हेतू आयोजकांनी व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनाची मूल्ये रुजविण्यासाठी कला हा प्रभावी मार्ग असल्याचा विश्वासही पालिकेने व्यक्त केला आहे.

स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना पर्वत संरक्षण, कचरा व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन, स्वच्छता आणि शाश्वत हिल स्टेशन या विषयांवर पोस्टरद्वारे प्रभावी संदेश मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमातून पर्यावरणाबाबत सजग आणि सक्रिय भूमिका घेणारी पुढील पिढी तयार होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी खालील विषय जाहीर करण्यात आले आहेत – आपल्या पर्वतांचे संरक्षण, कचऱ्याचे वर्गीकरण करा – पर्वतांचे रक्षण करा आणि ग्रीन हिल्स, क्लीन हिल्स.

शहरातील सर्व शाळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन गिरीस्थान नगरपरिषद आणि हिल्दारी यांच्या मार्फत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून नावनोंदणी करता येणार आहे.

अधिक माहितीसाठी हिल्दारीचे श्री. दीपक मदने (मो. ९८५००९८३०३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl