ब्रेकिंग न्यूज : महाबळेश्वर नगरपालिका — पहिल्या फेरीअखेर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत सुनील शिंदे आघाडीवर
ब्रेकिंग न्यूज : महाबळेश्वर नगरपालिका — पहिल्या फेरीअखेर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत सुनील शिंदे आघाडीवर
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणूक मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत सुनील शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. उपलब्ध माहितीनुसार सुनील शिंदे हे दोन नंबरच्या गाडीवर निवडणूक रिंगणात असून पहिल्या फेरीत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी मिळवली आहे. त्यांच्या पाठोपाठ डी.एम. बावळेकर हे दुसऱ्या क्रमांकावर असून कुमार शिंदे हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मतमोजणी केंद्र परिसरात पहिल्या फेरीच्या निकालानंतर उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते आणि समर्थक पुढील फेऱ्यांकडे लक्ष ठेवून आहेत. पहिल्या फेरीत मिळालेल्या आघाडीमुळे सुनील शिंदे यांच्या गटात उत्साह संचारला आहे, तर इतर उमेदवारांकडूनही पुढील फेऱ्यांत आघाडी बदलण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
मतमोजणीची प्रक्रिया अद्याप सुरू असून उर्वरित फेऱ्यांमध्ये मतांचे गणित बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा अंतिम निकाल कोणाच्या पारड्यात जाणार, याबाबत महाबळेश्वर शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढील फेरीअखेर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून संपूर्ण शहराचे लक्ष मतमोजणीकडे लागून राहिले आहे.
Comments
Post a Comment