भारतीय संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ पुस्तकाचे प्रकाशन;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक

‘भारतीय संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ पुस्तकाचे प्रकाशन;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचे उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक

नागपूर  विशेष प्रतिनिधी – 

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी पर्वानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन आज नागपुरात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांविषयी आणि प्रशासनकौशल्याविषयी मनापासून गौरवोद्गार काढत त्यांचे विशेष कौतुक केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “देशात संविधानाचे मूळ तत्त्व, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि प्रत्येक घटक सहज, सोप्या आणि सर्वसामान्याना समजेल अशा भाषेत उलगडून सांगणारा दुसरा मुख्यमंत्री क्वचितच आढळेल. देवेंद्रजींचा कायद्याचा गाढा अभ्यास, अर्थशास्त्रातील सखोल पकड आणि प्रशासन हाताळण्यातील तज्ज्ञता हेच त्यांच्या यशस्वी राजकीय प्रवासाचे मुख्य घटक आहेत.”

त्यांनी पुढे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना सहजच नागपूरच्या चवीचा संदर्भ घेतला. “देवेंद्रजी सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत,” असे सांगत त्यांच्या शांत, स्थिर आणि थंड डोक्याने निर्णय घेण्याच्या क्षमतेचेही त्यांनी विशेष कौतुक केले. गंभीर परिस्थितीतही स्थैर्य राखून योग्य निर्णय घेणे हा त्यांचा अद्वितीय गुण असल्याचे शिंदे यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस यांच्या भावनिक बाजूलाही उजाळा दिला. “कर्करोगाने वडिलांचे निधन झाल्यानंतर नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभारून कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी आधार निर्माण करणारे देवेंद्रजी आम्ही जवळून पाहिले आहोत,” असे सांगत त्यांनी २०२२ मधील निर्णायक घडामोडींमध्ये फडणवीस यांनी दिलेला मित्रत्वपूर्ण पाठिंबा आपल्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचेही मत व्यक्त केले.

यावेळी त्यांनी केलेली तुलना विशेष लक्षवेधी ठरली. “अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे ‘बिग बी’ असतील, पण देवेंद्रजी हे सभागृहाचे ‘बिग डी’ आहेत,” असे म्हणताना त्यांनी Dedication, Determination, Discipline आणि Devotion हे चार मुद्दे फडणवीस यांच्या कार्यशैलीत पूर्णत्वाने दिसतात, असे सांगत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट उडवला.

या पुस्तकाचा प्रसार सर्व भाषांत व्हावा, प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि ग्रंथालयात ते उपलब्ध व्हावे, तसेच राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ते संदर्भग्रंथ म्हणून वापरावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

या प्रकाशन सोहळ्यास राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पुस्तकाची प्रत पाहण्यासाठी आणि फडणवीस यांच्या भाषणातील संविधान विषयक विचार ऐकण्यासाठी उपस्थितांमध्ये उत्सुकता दिसून आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl