धम्मविचारांची उज्ज्वल मशाल; गोगवे येथे धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराने चेतवली वैचारिक जाणीव
धम्मविचारांची उज्ज्वल मशाल; गोगवे येथे धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराने चेतवली वैचारिक जाणीव
गोगवे प्रतिनिधी —
भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पश्चिम विभाग यांच्या विध्यमानाने कराड येथे दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या धम्म परिषदेच्या पार्श्वभूमीवर दि. १४ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत पंचशील बौद्ध विहार, आंबेडकर नगर, गोगवे येथे धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून धम्म उपासिकांसाठी वैचारिक, ऐतिहासिक व सामाजिक आशय असलेल्या सहा पुष्पांची प्रभावी गुंफण करण्यात आली.
शिबिरादरम्यान संत गाडगे बाबा महाराज तसेच माता भीमाबाई रामजी सपकाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे बौद्धांचे पवित्र स्थळे या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर केंद्रीय शिक्षिका आदरणीय ज्योतीताई क्षीरसागर यांनी सखोल अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवचन केले. त्यांच्या प्रवचनातून बौद्ध धम्माचा इतिहास, मूल्यव्यवस्था, मानवतावादी विचार आणि आधुनिक समाजातील त्याचे महत्त्व याचे स्पष्ट दर्शन घडले.
प्रवचनास प्रारंभ करण्यापूर्वी आदर्शांचे पूजन व बुद्ध-वंदना घेण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमास धार्मिक आणि वैचारिक अधिष्ठान लाभले. या धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिरास भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका महिला संघटक आयुनी निलम उत्तम कदम, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा आयुनी संगीता संजय कदम, सचिव आयुनी मंगल चोखू कदम, गोगवे गावचे पोलिस पाटील आदरणीय उत्तम शिवाजी कदम, नवतरुण बौद्ध विकास मंडळाचे सचिव आयु. साईप्रसाद तुळशीराम कदम, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आयु. तुळशीराम भैरू कदम तसेच तक्षशिला ग्रंथालयाचे ग्रंथपाल कुमार करण संजय कदम यांनी उपस्थित राहून शिबिरास भेट दिली व सदिच्छा व्यक्त केल्या.
संपूर्ण कालावधीत घेण्यात आलेली प्रवचने अत्यंत शिस्तबद्ध, चिंतनशील आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे शिबिरास वैचारिक बळ मिळाले असून धम्म उपासिकांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक बांधिलकी आणि धम्ममूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली. अखेरीस धम्म, संघ आणि सामाजिक एकतेचा संदेश देत हे धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाले.
Comments
Post a Comment