पुणे–पिंपरी चिंचवड ते शिंदी एसटी बससेवा मार्गावर; शिंदी व कोकण विभागातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा

पुणे–पिंपरी चिंचवड ते शिंदी एसटी बससेवा मार्गावर; शिंदी व कोकण विभागातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा

पुणे प्रतिनिधी : 

शिंदी विभाग तसेच कोकण विभागातील प्रवाशांची वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून पुणे–पिंपरी चिंचवड ते शिंदी अशी एसटी बससेवा कायमस्वरूपी रूपाने सुरू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आशिर्वादाने सुरू झालेली ही सेवा पुणे विभाग व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अधिकृतपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल केली आहे.

ही एसटी बससेवा स्वारगेट, ताम्हिणी घाट, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड, खोपी मार्गे शिंदीपर्यंत धावणार असून पुणे–कोकण दरम्यानच्या प्रवासाला आता स्थिर, सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या कामगार, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

या निर्णयामागे शिंदी गावातील युवकांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, संघटित प्रयत्न आणि प्रशासनाशी केलेले नियमित संवाद हे घटक महत्त्वाचे ठरले. शिंदी गावचे सुपुत्र व कांदाटी भागातील युवा कार्यकर्ते तसेच नवतरुण मित्र मंडळ मौजे शिंदी मुंबईचे विद्यमान उपाध्यक्ष भूषण अनिलराव मोरे व नितीन सुनिलराव मोरे यांच्यासह सौरभ विनोदराव मोरे यांच्या सततच्या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. नवतरुण मित्र मंडळ मौजे शिंदी मुंबईच्या सहकार्यातून सुरेश लाडकोजीराव मोरे, विलास गंगाराम मोरे, वैभव विनायक मोरे, जितेंद्र पांडुरंग मोरे यांचाही या उपक्रमात सक्रिय सहभाग होता.

नवीन बससेवेचा शुभारंभ पुणे पिंपरी चिंचवड बसआगारातून रात्री ९.३० वाजता करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नितीन पवार यांच्या उपस्थितीत ही बस शिंदीकडे रवाना झाली. आगारातील सहाय्यक आगार निरीक्षक वसंत रावते, चालक चव्हाण आणि सोमनाथ महाजन तसेच वाहक वाघमारे आणि महेंद्र कोळी यांनी पहिल्या फेरीसाठी जबाबदारी सांभाळली.

या प्रसंगी शिंदी गावचे नितीन मोरे, सौरभ मोरे, कुळवंडी गावचे विलास निकम, चंद्रकांत मोरे, विजय मोरे, वैभव मोरे, जितेंद्र मोरे, प्रमोद मोरे, शुभम मोरे यांच्यासह गावातील महिलांमध्ये सौ. शुभांगी शिंदे, सौ. रोहिणी मोरे, सौ. वैशाली मोरे तसेच प्रवासी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या बससेवेच्या सुरूवातीमुळे पुणे–शिंदी–कोकण दरम्यान प्रवास सुलभ होईल आणि स्थानिकांना रोजगार, शिक्षण, व्यापार तसेच वैद्यकीय कारणांसाठी येण्या-जाण्यात आता मोठी सोय उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl