ब्रेकिंग न्यूज : महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक — अनेक प्रभागांत नगराध्यक्षपदासाठी सुनील शिंदे आघाडीवर

ब्रेकिंग न्यूज : महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक — अनेक प्रभागांत नगराध्यक्षपदासाठी सुनील शिंदे आघाडीवर
महाबळेश्वर प्रतिनिधी

महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणूक मतमोजणीत नगराध्यक्षपदासाठी सुनील शिंदे यांनी अनेक प्रभागांत आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. प्रभाग क्रमांक चारमध्ये सुनील शिंदे यांना 272 मते मिळाली असून डी.एम. बावळेकर यांना 141 तर कुमार शिंदे यांना 113 मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक पाचमध्ये सुनील शिंदे यांनी 301 मते घेत भक्कम आघाडी मिळवली असून कुमार शिंदे यांना 96 तर डी.एम. बावळेकर यांना 117 मते मिळाली आहेत.

प्रभाग क्रमांक सहामधून सुनील शिंदे यांना 265 मते मिळाली असून कुमार शिंदे यांना 209 आणि गोळेकर यांना 97 मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक आठमध्ये मात्र लढत चुरशीची असून येथे कुमार शिंदे यांना 295 मते मिळाली आहेत, तर सुनील शिंदे यांना 218 आणि डी.एम. बावळेकर यांना 72 मते मिळाली आहेत.

प्रभाग क्रमांक दहामधून सुनील शिंदे यांनी 321 मते मिळवत आघाडी घेतली असून कुमार शिंदे यांना 135 तर डी.एम. बावळेकर यांना 172 मते मिळाली आहेत. मतमोजणी सुरू असून पुढील फेऱ्यांत अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत सुनील शिंदे यांची आघाडी कायम राहते की समीकरणे बदलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl