अजिंक्यताऱ्याच्या साक्षीने साजरा शाही वैवाहिक सोहळा; राजकुमारी ऋणालीराजे आणि रविराज देशमुख यांचा भव्य विवाह संपन्न


अजिंक्यताऱ्याच्या साक्षीने साजरा शाही वैवाहिक सोहळा; राजकुमारी ऋणालीराजे आणि रविराज देशमुख यांचा भव्य विवाह संपन्न

सातारा प्रतिनिधी : 

साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला साजेसा आणि छत्रपती घराण्याच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारा राजेशाही विवाहसोहळा शेंद्रे येथे गुरुवारी अत्यंत दिमाखात पार पडला. सातारा-जावळीचे आमदार व राज्याचे बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुपुत्री राजकुमारी ऋणालीराजे आणि सांगली जिल्ह्यातील रा. कडेपूर येथील चि. रविराज देशमुख यांचा विवाह सायं. ५.२१ वाजता पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला.

अजिंक्यतारा किल्ल्याच्या साक्षीने आणि साताऱ्याच्या राजेशाही सांस्कृतिक परंपरेने सजलेल्या या सोहळ्याने परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण केले. छत्रपती घराण्याची शालीनता, शिस्तबद्धता आणि अतिथ्यपरंपरा या विवाहात उजळून निघाली. विविध पारंपरिक विधींच्या मंगल वातावरणात वधू–वरांनी संसारारंभ केला.

विशेष म्हणजे, विवाहसोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत वधू-वरांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्त केला. समाजकारणाचा वारसा जपणारा हा उपक्रम उपस्थित मान्यवरांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला.

सोहळ्यास मंत्रिमंडळातील सदस्य, जनप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि छत्रपती घराण्याचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाही सोहळ्याची भव्यता, नितांत सौंदर्य आणि सुव्यवस्थित आयोजनामुळे शेंद्रे परिसरात ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl