गवडी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट्स ड्रेस वाटप; सामाजिक बांधिलकीचे आनंदा पवार यांचे उपक्रम कौतुकास्पद

गवडी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट्स ड्रेस वाटप; सामाजिक बांधिलकीचे आनंदा पवार यांचे उपक्रम कौतुकास्पद

 मेढा प्रतिनिधी —

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गवडी येथे आज माजी उपसरपंच श्री. आनंदा विष्णू पवार यांच्या सौजन्याने सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच क्रीडेला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून मनापासून स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश गोळे होते. यावेळी समिती सदस्य श्री. विकास धनावडे, गावचे पोलिस पाटील श्री. रविंद्र चव्हाण, ग्रामस्थ श्री. शांताराम जांभळे, श्री. दत्तात्रय जांभळे, श्री. प्रसाद धनावडे, श्री. अजित सपकाळ, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. सचिन धनावडे, शाळेला वेळोवेळी मदत करणारे श्री. गणेश धनावडे, लहुजी सेना अध्यक्ष व पत्रकार श्री. मोहन खुडे, शाळेतील सर्व शिक्षकवर्ग तसेच अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल आनंदा पवार यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. स्पोर्ट्स ड्रेसमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड वाढेल तसेच शालेय क्रीडा उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण ढेबे यांनी श्री. आनंदा पवार तसेच उपस्थित सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. गावाने शाळेला असेच सहकार्य करावे आणि भविष्यातही शाळेला दातृत्व लाभावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शाळा व्यवस्थापन समिती गवडी, श्री. चवणेश्वर प्रतिष्ठाण मंडळ गवडी आणि ग्रामस्थ मंडळ गवडी यांच्या वतीने श्री. आनंदा विष्णू पवार यांचे विशेष आभार मानण्यात आले असून त्यांना उदंड आयुष्य लाभो, अशी प्रार्थना चवणेश्वर चरणी करण्यात आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl