नाकर्त्या विरोधकांना मतदार बाजूला ठेवतील; विकासासाठी मंत्रालयाचे दरवाजे ठोठावून निधी आणणार – कुमार शिंदे

नाकर्त्या विरोधकांना मतदार बाजूला ठेवतील; विकासासाठी मंत्रालयाचे दरवाजे ठोठावून निधी आणणार – कुमार शिंदे

महाबळेश्वर | प्रतिनिधी –

महाबळेश्वर गिरिस्थान नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना, कर्तव्य विसरलेल्या आणि काम न करणाऱ्या उमेदवारांना महाबळेश्वरचे मतदार येत्या २० तारखेला होणाऱ्या मतदानात निश्चितच बाजूला ठेवतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेले काही लोकप्रतिनिधी तब्बल दीड वर्षे पालिकेच्या सर्वसाधारण सभांना गैरहजर राहिले, हे महाबळेश्वरच्या जनतेने पाहिले असून ही चूक आता दुरुस्त करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या निवडणूक प्रचारामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर कुमार शिंदे आणि त्यांच्या आघाडीतील नगरसेवक पदाचे उमेदवार जोमाने प्रचार करत असून ठिकठिकाणी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाची दिशा स्पष्ट करत आहेत. प्रचारादरम्यान विरोधकांच्या कार्यपद्धतीवर शाब्दिक प्रहार करत शिंदे म्हणाले की, जनतेने ज्यांना विश्वासाने निवडून दिले, त्या प्रतिनिधींनीच आपल्या मूळ कर्तव्याचा विसर पाडला. जनतेचे प्रश्न सभागृहात मांडणे, अडचणी सोडवणे आणि विकासासाठी पुढाकार घेणे हे काम करण्याऐवजी विरोधकांनी मागील पंचवार्षिक कार्यकाळात केवळ वेळ घालवला, असा आरोप त्यांनी केला.

पालिकेच्या सर्वसाधारण सभांना नियमित हजर राहण्याचे साधे कर्तव्यही न पाळणाऱ्या या सदस्यांनी जनतेचा विश्वासघात केला असल्याचे सांगत, अशा प्रवृत्तींना महाबळेश्वरचे मतदार कधीही विसरणार नाहीत, असे शिंदे म्हणाले. एकदाच झालेली चूक आता दुरुस्त करण्याची संधी उद्याच्या नगरपालिका निवडणुकीत मतदारांना मिळणार असून महाबळेश्वरच्या विकासात अडसर ठरणाऱ्या प्रवृत्तींना मतदारराजा खड्यासारखे वेचून बाजूला ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फक्त टीका करून राजकारण करणारे नव्हे, तर जनतेचे प्रश्न सभागृहात ठामपणे मांडणारे, गरज पडल्यास मंत्रालय आणि सचिवालयाचे दरवाजे ठोठावून महाबळेश्वरसाठी विकासनिधी खेचून आणणारे प्रतिनिधी मतदार निवडून देतील, असा दावा कुमार शिंदे यांनी केला. महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने मेहनत घेतली असून येत्या काळात रोज कार्यक्रम राबवून शहराचा रखडलेला विकास निश्चितच करून दाखवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl