जीएसटी अधिकाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन तीव्र; साताऱ्यात सामूहिक रजा आंदोलनातून सरकारला ठाम इशारा

जीएसटी अधिकाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन तीव्र; साताऱ्यात सामूहिक रजा आंदोलनातून सरकारला ठाम इशारा

सातारा प्रतिनिधी :

राज्य वस्तू व सेवा कर विभागातील विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील जीएसटी अधिकारी आणि कर्मचारी यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून सातारा वस्तू व सेवा कर भवनामध्ये बुधवारी राजपत्रित अधिकारी संघटनेतर्फे सामूहिक रजा आंदोलनाचा अवलंब करण्यात आला. या आंदोलनात अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सकाळी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सर्व अधिकारी एकत्र येऊन द्वारसभा घेण्यात आली. घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर सामूहिक रजेमार्फत प्रलंबित मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली.

या वेळी राजपत्रित अधिकारी संघटनेचे  सदस्य श्री. अभिजीत भोसले यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून विभागातील प्रशासकीय मागण्या प्रलंबित असल्याची माहिती देताना अनेक वेळा लेखी निवेदने, बैठका व चर्चा करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे त्यांनी सांगितले.

सामूहिक रजा आंदोलनादरम्यान राज्यकर उपायुक्त, राज्यकर सहाय्यक आयुक्त, राज्यकर अधिकारी तसेच विभागातील विविध कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनुष्यबळ वाढ, पदोन्नती प्रक्रिया, सेवा सुधारणा, कार्यालयीन सुविधा, तांत्रिक संसाधने उपलब्धता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनी एकमुखाने नाराजी व्यक्त केली.

सरकारने मागील चर्चांमध्ये केलेली आश्वासने वेळेत पूर्ण केली नाहीत, तर पुढील टप्प्यात आंदोलन तीव्र करण्याचा ठाम इशारा अधिकारी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यास विभागातील असंतोष वाढू शकतो, म्हणून सरकारने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी अधिकाऱ्यांनी यावेळी केली.


---

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl