प्रभाग क्रमांक ५ मध्ये सौ. प्रभा विजय नायडू यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त सुरुवात; विकासासाठी मतदारांना साद
प्रभाग क्रमांक ५ मध्ये सौ. प्रभा विजय नायडू यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त सुरुवात; विकासासाठी मतदारांना साद
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये सौ. प्रभा विजय नायडू यांच्या प्रचाराची अधिकृत सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक, व्यापारी, महिला व युवक उपस्थित होते. प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी वातावरणात उत्साह दिसून येत होता.
यावेळी विजयभाऊ नायडू यांनी उपस्थित मतदार बंधू-भगिनींना संबोधित करत प्रभाग क्रमांक ५ मधील सर्व नागरिकांनी एकजुटीने सौ. प्रभा विजय नायडू यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभागातील विविध समस्या नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आणि महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभा नायडू यांना एकदाच नगरसेविका म्हणून निवडून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या माध्यमातून प्रभागासह संपूर्ण महाबळेश्वरच्या विकासाला गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या प्रचारप्रसंगी परीट संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, व्यापारी दिलीप शेपटे, हरिभाऊ शेटे, हॉटेल उद्योजक दीपक शेठ, डोईफोडे कुटुंबातील चंदूभाऊ व अपूर्वा डोईफोडे, पिंटू येवले, अनिल येवले, किरण जाधव, अभिजीत जाधव, सचिन गुजर, प्रकाश नायडू, राहुल तांबे, संदेश भिसे, दिनेश भिसे, सचिन ओतारी, राहुल साळुंखे, किरण मोरे यांच्यासह आरपीआय महिला आघाडीच्या पदाधिकारी, वर्षाताई आरडे, सुनिताताई फळणे, उपशहर आशाताई जाधव, शितलताई ओतारी, सुरेखाताई पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. प्रभाग क्रमांक ५ मधील मोठ्या संख्येने मतदारांनी उपस्थित राहून सौ. प्रभा विजय नायडू यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. प्रचाराच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभागात निवडणूक वातावरण तापू लागले असून आगामी काळात प्रचाराला आणखी वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments
Post a Comment