कुंभरोशी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न होणार

कुंभरोशी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न होणार

कुंभरोशी प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी येथील कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेव संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. “न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते” या बोधवाक्यानुसार ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तेचा गौरव करणारा हा कार्यक्रम विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेवचे अध्यक्ष मा. श्री. किसन जाधव (दादा) राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. अजय चौधरी साहेब, पंचायत समिती मधरचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. रमेश गंबरे, रोटरी क्लब हडपसर पुणेचे अध्यक्ष मा. श्री. संभाजी काकडे, उद्योजक मा. श्री. अरुणशेठ साहेब यांच्यासह शिक्षण, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच रोटरी क्लब हडपसर पुणेचे विविध पदाधिकारी व रोटेरीयन, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते आणि हस्तकला क्षेत्रातील प्रतिनिधी यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या समारंभास कोयना एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. एम. पी. फळणे, सचिव मा. श्री. डी. के. जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री. बी. व्ही. शेलार, संस्थेचे संचालक मंडळ, माजी विद्यार्थी विविध बॅचचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शिक्षणप्रेमी पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील गुणवंत कामगिरीचा गौरव करण्यात येणार असून पारितोषिक वितरणाद्वारे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मोझर ए. बी., कार्याध्यक्ष श्री. बुरुंगले आर. एस्., विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ जंगम व कु. प्राची भिलारे यांनी सर्व पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन केले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl