अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पाचगणी पोलिसांची जलद कामगिरी; आरोपी अटक, पीडित सुरक्षित

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पाचगणी पोलिसांची जलद कामगिरी; आरोपी अटक, पीडित सुरक्षित

पाचगणी प्रतिनिधी : 

पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात पाचगणी पोलिसांनी तात्काळ आणि प्रभावी कारवाई करत आरोपीस अटक करून पीडित मुलीस सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

पाचगणी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०८/२०२५ अंतर्गत भा.न्या.सं. कलम १३७ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) २०१२ चे कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपी सनी गौतम कुचेकर (वय २६, रा. मुगाव, पो. सोनेरी, ता. परांडा, जि. धाराशिव) याने १२ वर्षे ८ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीशी ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता तिला तिच्या पालकांच्या ताब्यातून पळवून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच दिवशी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत संवेदनशील असल्याने पोलिसांनी वेळ न दवडता स्वतंत्र पथकाची स्थापना करून आरोपी व पीडितेचा शोध सुरू केला. परांडा (जिल्हा धाराशिव) आणि करमाळा (जिल्हा सोलापूर) या परिसरात व्यापक शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र आरोपीने मोबाईल फोन बंद ठेवून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.

तरीही पोलिसांनी तपासात कसूर न करता तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर आरोपी व पीडित मुलगी अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथे एकत्र असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर तात्काळ कारवाई करत आरोपी सनी कुचेकर यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पीडित मुलीस सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, सहाय्यक फौजदार रविंद्र कदम, पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे व निलेश माने, महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा फरांदे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुमित मोहिते यांनी महत्त्वाची व उल्लेखनीय भूमिका बजावली आहे.

या उत्कृष्ट, धाडसी आणि संवेदनशील कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संपूर्ण पाचगणी पोलीस पथकाचे विशेष अभिनंदन करत, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl