महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर परदेशी नागरिकांविरोधात कडक कारवाईची मागणी; भाजपाचे निवेदन पोलीस निरीक्षकांकडे

महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर परदेशी नागरिकांविरोधात कडक कारवाईची मागणी; भाजपाचे निवेदन पोलीस निरीक्षकांकडे

महाबळेश्वर प्रतिनिधी —

महाबळेश्वर शहर व परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या आणि विविध ठिकाणी काम करणाऱ्या संशयित परदेशी नागरिकांविरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. भाजपाचे सनी मोरे यांच्यासह सहकाऱ्यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांना यासंदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले. संविधान आणि कायद्याच्या चौकटीत हे निवेदन देण्यात आले असून, शहराच्या अंतर्गत सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही संशयित व अनोळखी परदेशी नागरिक योग्य कागदपत्रांशिवाय वास्तव्यास असून ते घरगुती कामगार, रिअल इस्टेट व बांधकाम क्षेत्रातील मजूर, रोजंदारीवर काम करणारे कामगार तसेच बेकायदेशीर विक्रेते म्हणून कार्यरत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारचे अनधिकृत वास्तव्य व रोजगार हे परदेशी कायदा १९४६, पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा १९२० तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील तरतुदींचे उल्लंघन असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने तसेच स्थानिक नागरिकांचे हक्क आणि कायद्याचे राज्य अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकरणांमध्ये तातडीची आणि कठोर कारवाई आवश्यक असल्याचे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. यासाठी महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित परदेशी नागरिकांची सखोल पडताळणी मोहीम राबवावी, वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा एफआरआरओ नोंदणी नसलेल्या व्यक्तींवर लागू कायद्यांनुसार कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास विशेष शाखा, एटीएस व एफआरआरओ यांच्याशी समन्वय साधावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच बेकायदेशीर परदेशी नागरिकांना जाणूनबुजून कामावर ठेवणाऱ्या व्यक्तींविरुद्धही कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. हे निवेदन कोणत्याही व्यक्तीविरुद्ध द्वेषातून नसून केवळ देशाची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि स्थानिक नागरिकांच्या हितासाठी दिले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासनाने योग्य ती कायदेशीर पावले उचलावीत, अशी अपेक्षा भाजपाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी राजेंद्र पवार, माजी शहराध्यक्ष महाबळेश्वर, विराज शिर्के आणि सतिश लोखंडे उपस्थित होते.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl