इस्त्रायलमध्ये मोठी रोजगारसंधी; साताऱ्यातील कुशल उमेदवारांसाठी १,६०० हून अधिक जागा खुल्या


इस्त्रायलमध्ये मोठी रोजगारसंधी; साताऱ्यातील कुशल उमेदवारांसाठी १,६०० हून अधिक जागा खुल्या

सातारा प्रतिनिधी :

 महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत सातारा जिल्ह्यातील बेरोजगार व पात्र उमेदवारांसाठी परदेशी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इस्त्रायलमधील Renovation Construction क्षेत्रात Ceramic Tiling, Drywall Worker आणि Mason या पदांसाठी तब्बल १,६०० हून अधिक जागा खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये Ceramic Tiling – 1000 जागा, Drywall Worker – 300 जागा आणि Mason – 300 जागा अशा भरतीची तरतूद आहे.

या पदांसाठी उमेदवारांचे इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान आवश्यक असून Reading, Writing आणि Speaking या तिन्ही कौशल्यांची अपेक्षा आहे. तसेच किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असावी आणि उमेदवारांचे वय २५ ते ५० वर्षे दरम्यान असावे. बांधकाम क्षेत्रातील संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरतील.

इस्त्रायलमध्ये उच्च दर्जाच्या बांधकाम कामांसाठी भारतीय कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी असल्याने या भरती प्रक्रियेबद्दल उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व ऑनलाइन नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास https://maharashtrainternational.com भेट देण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

परदेशात रोजगार मिळवण्याची ही सुवर्णसंधी असून पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता नोंदणी करावी, असेही पवार यांनी सांगितले.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl