महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२५ : सुनील लक्ष्मण शिंदे यांचा १४५१ मतांनी दणदणीत विजय, शहराने दिला स्पष्ट कौल



महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक २०२५ : सुनील लक्ष्मण शिंदे यांचा १४५१ मतांनी दणदणीत विजय, शहराने दिला स्पष्ट कौल

महाबळेश्वर, प्रतिनिधी —

 महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा अंतिम निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठा बदल स्पष्टपणे दिसून आला आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत सुनील लक्ष्मण शिंदे यांनी दुसऱ्या व अंतिम फेरीअखेर ४६४७ मते मिळवत आपल्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यावर १४५१ मतांची निर्णायक आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे मतदारांनी विकास, स्थैर्य आणि सक्षम नेतृत्वाच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्याचे चित्र समोर आले आहे.

या निवडणुकीत एकूण १० हजार ५७६ मते नोंदवली गेली. नगराध्यक्षपदाच्या लढतीत कुमार गोरखनाथ शिंदे यांना ३१८९ मते मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर बावळेकर दत्तात्रय मारुती यांना २५३८ मते मिळाली. संजय गिरीधर पाटील यांना १३० मते, सतीश हणमंत साळुंखे यांना २९ मते मिळाली असून ४३ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला.

नगरपरिषद सदस्य निवडणुकीतही प्रत्येक प्रभागात चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. प्रभाग क्रमांक १ (जागा १ अ) मध्ये राजू इस्माईल नालबंद यांनी ५२३ मते मिळवत १७१ मतांनी विजय मिळवला, तर शेख युसुफ हसन यांना ३५२ मते मिळाली. प्रभाग क्रमांक १ (जागा १ ब) मध्ये बावळेकर विद्या शरद यांनी ३५६ मते मिळवत ५० मतांनी विजय मिळवला. या ठिकाणी नावेद अझरुद्दीन बडाणे यांना ३०६, प्रियंका अजित बावळेकर यांना २१७ आणि चौगुले झीनत याकूब यांना १८८ मते मिळाली.

प्रभाग क्रमांक २ (जागा २ अ) मध्ये संतोष मारुती आखाडे यांनी ३५५ मते मिळवत ८० मतांनी विजय मिळवला. आसिफ सत्तार शेख यांना २७५, प्रशांत महादेव आखाडे यांना ९९ आणि शंकर काळे यांना ७७ मते मिळाली. प्रभाग २ (जागा २ ब) मध्ये संगीता दत्तात्रय वाडकर यांनी ६०६ मते घेत ४१३ मतांची मोठी आघाडी मिळवत स्पष्ट विजय मिळवला, तर सोनाली रोहित बांदल यांना १९३ मते मिळाली.

प्रभाग क्रमांक ३ (जागा ३ अ) मध्ये पार्ट विमल पांडुरंग यांनी ८२१ मते मिळवत ३७० मतांनी दणदणीत विजय मिळवला, तर पूजा तुषार उतेकर यांना ४५१ मते मिळाली. जागा ३ ब मध्ये रविंद्र मधुकर कुंभारदरे यांनी ४५३ मते मिळवत अवघ्या ३ मतांनी अटीतटीचा विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक ४ (जागा ४ अ) मध्ये कुमार गोरखनाथ शिंदे यांनी ५४८ मते मिळवत ३६५ मतांनी विजय संपादन केला. संजय रामचंद्र कदम यांना १९२, बाळकृष्ण बबन साळुंखे यांना ६८ आणि किरण गोरखनाथ शिंदे यांना ५९ मते मिळाली. प्रभाग ४ (जागा ४ ब) मध्ये बिरामणे विमल पांडुरंग यांनी ४७८ मते मिळवत ९८ मतांनी विजय मिळवला, तर वंदना मनीष ढेबे यांना ३८० मते मिळाली.

प्रभाग क्रमांक ५ (जागा ५ अ) मध्ये पाटील स्मिता सुनील यांनी ५२१ मते मिळवत २१८ मतांनी विजय मिळवला. अर्पणा अतुल सलागरे यांना ३०३, सना साकिब शेख यांना १७५ मते मिळाली. प्रभाग ५ (जागा ५ ब) मध्ये संजय बाळकृष्ण जंगम यांनी ६०१ मते मिळवत १११ मतांनी विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक ६ (जागा ६ अ) मध्ये नीता आकाश झाडे यांनी ६१५ मते मिळवत १२० मतांनी विजय मिळवला, तर उषा किशोर कोंडके यांना ४९५ मते मिळाली. प्रभाग ६ (जागा ६ ब) मध्ये संतोष आबा शिंदे यांनी ६४८ मते मिळवत ३९६ मतांची मोठी आघाडी घेत विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक ७ (जागा ७ अ) मध्ये मानकर शबाना अल्ताफ यांनी ५३६ मते मिळवत अवघ्या १३ मतांनी विजय मिळवला, तर तरन्नुम अफजल वलगे यांना ५२३ मते मिळाली. प्रभाग ७ (जागा ७ ब) मध्ये नासिर युनुस मुलाणी यांनी ८०३ मते मिळवत मोठा विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक ८ (जागा ८ अ) मध्ये प्रियांका अक्षय वायदंडे यांनी ४६९ मते मिळवत ६ मतांनी निसटता विजय मिळवला. प्रभाग ८ (जागा ८ ब) मध्ये राहुल प्रकाश पिसाळ यांनी ८८३ मते मिळवत ३९७ मतांनी मोठा विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक ९ (जागा ९ अ) मध्ये रेश्मा किरण ढेबे यांनी ६२६ मते मिळवत २०२ मतांनी विजय मिळवला, तर प्रभाग ९ (जागा ९ ब) मध्ये अफजल मुबारक सुतार यांनी ६११ मते मिळवत ३८४ मतांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक १० (जागा १० अ) मध्ये पल्लवी संदीप कोंढाळकर यांनी ४०२ मते मिळवत १८६ मतांनी विजय मिळवला, तर जागा १० ब मध्ये रोहित बबन ढेबे यांनी ६२३ मते मिळवत ३५० मतांनी दणदणीत विजय मिळवला.

दि. २० डिसेंबर २०२५ रोजी शांततेत मतदान पार पडले होते, तर दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी महाबळेश्वर येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. या निकालामुळे महाबळेश्वरच्या राजकीय समीकरणांमध्ये स्पष्ट बदल घडून आला असून नव्या नेतृत्वाकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि परिणामकारक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl