पाचगणी पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे निर्विवाद वर्चस्व; दिलीप बगाडे नगराध्यक्ष, कासुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम


पाचगणी पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे निर्विवाद वर्चस्व; दिलीप बगाडे नगराध्यक्ष, कासुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम

भिलार प्रतिनिधी — 

पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल आज जाहीर झाला असून या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. माजी नगराध्यक्षा शेखर कासुर्डे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २१ पैकी तब्बल १६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमतासह पाचगणी नगरपालिकेची सत्ता खेचून आणली आहे. या निवडणुकीसाठी एकूण २१ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात उतरले होते आणि सर्वच प्रभागांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

निवडणूक प्रचाराच्या काळात स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नेतृत्वाचा अनुभव हे मुद्दे केंद्रस्थानी होते. या पार्श्वभूमीवर शेखर कासुर्डे यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास टाकत त्यांच्या पॅनेलला मोठे यश मिळवून दिले. २१ पैकी १६ जागांवर विजय मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले असून विरोधकांना अपेक्षेपेक्षा कमी यशावर समाधान मानावे लागले.

प्रभागनिहाय निकाल पाहता प्रभाग क्रमांक १ मधून वैभव कऱ्हाडकर यांनी २११ मते तर राजश्री सणस यांनी १८६ मते मिळवत विजय संपादन केला. प्रभाग क्रमांक २ मध्ये नरेंद्र बिरामने यांनी ४३६ मते तर सुप्रिया माने यांनी ४५५ मते घेत विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ३ मध्ये आकाश बगाडे यांनी ४३१ तर विमल भिलारे यांनी २७० मते मिळवली. प्रभाग क्रमांक ४ मध्ये शेखर कासुर्डे यांनी २४८ मते आणि परवीन मेमन यांनी १९८ मते घेत निवडणूक जिंकली.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये प्रसाद करंजकर यांनी ४९९ तर शिल्पा माने यांनी ३६६ मते मिळवली. प्रभाग क्रमांक ६ मध्ये विनोद बिरामणे यांनी ३७६ तर माधुरी कासुर्डे यांनी ३७३ मते मिळवत विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ७ मध्ये लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी २७४ तर राजेंद्र पारठे यांनी ३३६ मते मिळवली. प्रभाग क्रमांक ८ मध्ये अभिलाषा कऱ्हाडकर आणि अमित कांबळे यांनी विजय मिळवला, तर प्रभाग क्रमांक ९ मध्ये स्वाती कांबळे यांनी ५०२ आणि प्रकाश गोळे यांनी ५७५ मते मिळवत बाजी मारली. प्रभाग क्रमांक १० मध्ये महेश खांडके यांनी ३६४ तर अमृता गोळे यांनी ५७१ मते मिळवली.

नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीकडे संपूर्ण पाचगणीचे लक्ष लागले होते. या पदासाठी आठ उमेदवार रिंगणात होते. दिलीप बगाडे आणि संतोष कांबळे यांना प्रत्येकी २६७१ मते मिळाल्याचे चित्र सुरुवातीला समोर आले, मात्र अधिकृत निकालात दिलीप बगाडे यांनी बाजी मारत पाचगणीचे ‘कारभारी’ होण्याचा मान पटकावला. सुनील बगाडे यांना ९५०, दीपक कांबळे यांना २८५, सुनील कांबळे यांना ४०६, अमोल सावंत यांना ६६४, विजय वन्ने यांना १२६ तर दास चावरिया यांना ६० मते मिळाली.

निकाल जाहीर होताच शहरात उत्साहाचे वातावरण पसरले. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत, फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या विजयामुळे पाचगणीच्या राजकारणात त्यांचे वर्चस्व अधिक भक्कम झाले असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl