वाई नगरपरिषदेत भाजपचा झेंडा; अनिल सावंत नगराध्यक्षपदी विजयी, राष्ट्रवादीला नगरसेवकांत बळकटी

वाई नगरपरिषदेत भाजपचा झेंडा; अनिल सावंत नगराध्यक्षपदी विजयी, 
राष्ट्रवादीला नगरसेवकांत बळकटी

 वाई प्रतिनिधी –

वाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून अध्यक्षपदावर भाजपचे उमेदवार अनिल सावंत यांनी विजय मिळवत नगरपरिषदेत भाजपचा झेंडा फडकावला आहे. अध्यक्षपदासाठी पुरुष प्रवर्गातून लढलेल्या अनिल सावंत यांच्या विजयानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. या निकालामुळे वाई नगरपरिषदेच्या सत्तासमीकरणांकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी चांगली ताकद दाखवली आहे. वॉर्ड क्रमांक १ मध्ये अपर्णा जमदाडे आणि प्रसाद बनकर हे दोन्ही भाजपचे उमेदवार विजयी झाले. वॉर्ड क्रमांक २ मध्ये घनश्याम चक्के हे राष्ट्रवादीकडून, तर पद्मा जाधव भाजपकडून विजयी ठरल्या. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये संदीप जावळे आणि डॉ. जीविता जमदाडे या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली.वॉर्ड क्रमांक ४ मध्ये शारदा काळे आणि संग्राम पवार या दोन्ही उमेदवारांनी राष्ट्रवादीकडून विजय मिळवला. वॉर्ड क्रमांक ५ मध्ये भारत खामकर राष्ट्रवादीकडून, तर ज्योती गांधी भाजपकडून निवडून आल्या. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये जागृती पोरे आणि विजय ढेकाणे या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.वॉर्ड क्रमांक ७ मध्ये शैलेंद्र देवकुळे राष्ट्रवादीकडून, तर केतकी मोरे भाजपकडून विजयी ठरल्या. वॉर्ड क्रमांक ८ मध्ये अजित शिंदे आणि पदमश्री चोरगे या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले. वॉर्ड क्रमांक ९ मध्ये कांताराम जाधव आणि सुशील खरात हे दोन्ही उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले असून या निकालाने वॉर्ड ९ विशेष चर्चेत राहिला आहे.वॉर्ड क्रमांक १० मध्ये निलिमा खरात आणि गुरुप्रसाद चव्हाण हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. वॉर्ड क्रमांक ११ मध्ये संग्राम सपकाळ, दीपाली सावंत आणि नूतन मालुसरे या तिन्ही जागांवर भाजपने क्लीन स्वीप करत आपली ताकद दाखवून दिली.एकूण निकाल पाहता नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला लक्षणीय संख्याबळ मिळाले असले तरी अध्यक्षपद भाजपकडे गेल्याने वाई नगरपरिषदेत सत्ता-संतुलनाचा काळ सुरू होणार आहे. अध्यक्ष अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत विकासकामांना गती देण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले असून, तर राष्ट्रवादीकडूनही लोकहिताच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या निकालामुळे वाई शहराच्या राजकारणात नवे समीकरण आकारास येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl