वयगावकरांनी केला कृष्णा घाट स्वच्छ; ढोल्या गणपती परिसरात स्वयंस्फूर्त श्रमदानातून आदर्श उपक्रम

वयगावकरांनी केला कृष्णा घाट स्वच्छ; ढोल्या गणपती परिसरात स्वयंस्फूर्त श्रमदानातून आदर्श उपक्रम

विजय जाधव – प्रतिनिधी

वाई : लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या वाई येथील ढोल्या गणपती मंदिर परिसरातील कृष्णा नदी घाटाची वयगाव ग्रामस्थांनी रविवारी पहाटे स्वयंस्फूर्तपणे स्वच्छता केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी असलेल्या वयगाव गावाची सामाजिक जाणीव आणि पर्यावरणपूरक वाटचाल या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

वाई परिसरात स्थायिक असलेले वयगावचे ग्रामस्थ, एमआरए सेंटरची ग्रामपरी टीम आणि गणेशभक्त यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामाजिक कार्यकर्त्या रुपाली परिट यांच्या संकल्पनेतून “चला, गणपती मंदिर आणि कृष्णा काठ स्वच्छ करूया” या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थ एकत्र आले. स्वच्छता हीच सेवा या भावनेतून तब्बल दोन तास श्रमदान करून कृष्णा घाटावरील कचरा, प्लास्टिक व अन्य घाण हटवण्यात आली.

सध्या वयगाव गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सकारात्मक प्रभाव दिसून येत असून, गावातील ग्रामस्थ विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. या स्वच्छता मोहिमेमुळे नदी व घाट परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि भाविकांसाठी सुरक्षित झाला असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला आहे.

या स्तुत्य उपक्रमात सामाजिक कार्यकर्त्या रुपाली परिट, सारिका गवते, दीपक जाधव, मनिषा पवार, मारुती वाडकर, शंकर वाडकर, शिवाजी वाडकर, दिलीप वाडकर, सरपंच अश्विनी सुतार, उपसरपंच प्रशांत वाडकर, ग्रामपंचायत अधिकारी श्रीदेवी नुले यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या ढोल्या गणपती मंदिर परिसरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही सामूहिक असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले. वयगावकरांच्या या कृतीमुळे इतर गावांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून, भविष्यातही अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl