महाबळेश्वर निवडणूक प्रकरण उच्च न्यायालयात; उमेदवारी आक्षेपांवर १० डिसेंबरला सुनावणी

महाबळेश्वर निवडणूक प्रकरण उच्च न्यायालयात; उमेदवारी आक्षेपांवर १० डिसेंबरला सुनावणी

महाबळेश्वर प्रतिनिधी , दि.५ :

 महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या अर्जांवरील आक्षेपांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाचे प्रकरण अखेर उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले असून, या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सुनावणीवर केंद्रित झाले आहे. आज शिवसेनेचे दोन उमेदवार उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा अनिश्चिततेचे सावट आले आहे.

नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार कुमार शिंदे यांनी छाननीदरम्यान आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात — राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल शिंदे आणि लोकमित्र जनसेवा आघाडीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर — यांच्या अर्जांवर कर थकबाकी असल्याचा आरोप करून आक्षेप घेतले होते. तर प्रभाग क्रमांक ६ मधील शिवसेनेचे उमेदवार राहुल भोसले यांनी आपल्या राष्ट्रवादी प्रतिस्पर्धी संतोष शिंदे यांच्या उमेदवारीवर तीन अपत्य असल्याचे कारण सांगत आक्षेप नोंदवले होते.

या सर्व आक्षेपांची छाननी करताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन म्हस्के यांनी कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट करत सर्व आक्षेप फेटाळून लावले. या निर्णयाविरोधात कुमार शिंदे आणि राहुल भोसले यांनी वाई सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. तथापि, सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय अधिकारी म्हस्के यांनी दिलेल्या निर्णयाला दुजोरा देत शिवसेना उमेदवारांचे आक्षेप पुन्हा एकदा नामंजूर केले.

सत्र न्यायालयाचा निकाल प्रतिकूल लागल्याने पुन्हा निराश झालेल्या शिंदे आणि भोसले यांनी आज उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचीहत धरली आणि निर्णयाला आव्हान देत अपील दाखल केले. या प्रकरणावर दहापासून सुनावणी होणार असून यानंतर निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेवर महत्त्वाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नगराध्यक्षपदासह एकूण तीन उमेदवारांच्या अर्जांवरील वादामुळे निवडणूक स्थगित राहिल्याने राजकीय वातावरण तंग आहे. आता उच्च न्यायालयाचा निकालच निवडणूक प्रक्रियेची दिशा निश्चित करणार असल्याने महाबळेश्वरातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्ते, उमेदवार आणि नागरिक यांचे लक्ष या सुनावणीकडे लागून राहिले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl