आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त पांचगणीत उत्साहाचा महापूरआंतरशालेय पोस्टर स्पर्धेत ५००+ विद्यार्थ्यांचा सहभाग

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त पांचगणीत उत्साहाचा महापूर
आंतरशालेय पोस्टर स्पर्धेत ५००+ विद्यार्थ्यांचा सहभाग

पाचगणी प्रतिनिधी –

पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि हिलदारी यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आयोजित आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेत शहरातील शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरणाबद्दलची सजगता अधोरेखित केली. पाचगणीतील विविध शैक्षणिक संस्थांमधील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनाबाबतचे विचार रंगरेषांमधून प्रभावीपणे मांडले.

या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्वत संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे, कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देणे आणि स्वच्छ–हिरवे हिल स्टेशन घडविण्यासाठी पुढाकार घेण्यास प्रवृत्त करणे हा होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा उत्कृष्ट वापर करत कचरा वर्गीकरण, पर्वतांवरील वाढते प्रदूषण, जबाबदार पर्यटन, स्वच्छ पंचगणी, हरित पर्यावरण अशा विविध विषयांवर आकर्षक रंगसंगती आणि अर्थपूर्ण संदेश असलेली पोस्टर्स साकारली.

कार्यक्रमादरम्यान हिलदारी टीमने व्यक्त केले की, “विद्यार्थ्यांचा या प्रमाणात उत्साह पाहून आनंद होत आहे. पुढील पिढी पर्यावरणाबाबत अधिक सजग आणि सक्रिय असल्याचे या स्पर्धेतून स्पष्ट दिसते.” विद्यार्थ्यांच्या या सहभागाचे कौतुक म्हणून सर्वांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असून विजेत्यांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. तसेच विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

नगरपरिषदेकडून सांगण्यात आले की, “स्वच्छ, जबाबदार आणि पर्यावरणपूरक हिल स्टेशन निर्माण करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातील.”
या उपक्रमात योगदान दिल्याबद्दल एस. एम. बाथा हायस्कूल, गॉड्स व्हॅली इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन स्कूल व ज्युनियर कॉलेज, बेल एअर नर्सिंग कॉलेज, ग्रीन व्हॅली स्कूल, नगरपरिषद शाळा क्र. १ व २, पाइनवूड्स इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, विस्डम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, रीड अँड रायझ इन्स्टिट्यूट, विद्या निकेतन हायस्कूल, महात्मा फुले विद्या मंदिर, स्वीट मेमरीज हायस्कूल, किमिन्स हायस्कूल, बिलीमोरिया हायस्कूल, किड्स नेस्ट प्री-प्रायमरी स्कूल, हॅपी अवर्स हायस्कूल, शालोम इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज, संजीवन विद्यालय यांसह सर्व शैक्षणिक संस्थांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.

या उपक्रमाचे मार्गदर्शन पांचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील यांनी केले. पालिकेच्या अधिकारी–कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि हिलदारी टीमच्या परिश्रमांमुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली. आयोजकांनी भविष्यातही शाळांनी अशाच पर्यावरणपूरक मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl