महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेची ताकद एकवटली; जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची सर्वानुमते घोषणा

महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेची ताकद एकवटली; जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांची सर्वानुमते घोषणा

✍️महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर तालुक्यात आज १ डिसेंबर रोजी झालेल्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती तळदेव व कुंभरोशी गणातील अधिकृत उमेदवारांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तालुक्यातील ज्येष्ठ नेते, युवा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तमाम शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडलेली ही बैठक पक्षातील एकजूट आणि शिस्तीचे प्रभावी प्रदर्शन ठरली.

मा. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, तसेच मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शन आणि सन्माननीय संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हा प्रमुख रणजीत भोसले, उपजिल्हा प्रमुख संजय शेलार, जिल्हा संघटक समीर चव्हाण, युवासेना जिल्हा प्रमुख व कमिटी निरीक्षक विशाल संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत स्थानिक परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला. कमिटी सदस्य म्हणून विठ्ठल मामा शिंदे, चंद्रकांत संकपाळ गुरुजी, संभाजी जाधव गुरुजी, हरीभाऊ संकपाळ, चंद्रकांत कदम, किसन शिंदे (माचुतरे) आणि साळुंखे गुरुजी यांनीही सूक्ष्म माहिती आणि मतप्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.

सर्व उपस्थित इच्छुक उमेदवारांशी चर्चा, स्थानिक जनतेच्या भावना, विकासाच्या अपेक्षा आणि पक्षनिष्ठेचा विचार करता जिल्हा परिषद गटासाठी श्री अजित संकपाळ यांची एकमुखाने निवड करण्यात आली. तळदेव पंचायत समिती गणासाठी श्री संजय शेलार आणि कुंभरोशी गणासाठी श्री समीर चव्हाण या उमेदवारांची सर्वानुमते घोषणा करण्यात आली. या निर्णयाने दोन्ही समिती क्षेत्रांमध्ये शिवसेनेची निवडणूक मोहीम अधिक सुसूत्र आणि प्रभावी होणार असल्याचे नेत्यांनी व्यक्त केले.

निर्णय जाहीर करताना तालुका प्रमुख श्री गणेश उतेकर यांनी सर्व शिवसैनिकांनी दाखवलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पक्षाची एकनिष्ठ परंपरा कायम ठेवत हे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने खांद्याला खांदा लावून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक जनतेचे हित आणि शिवसेनेचा विचार प्रथम ठेवत पुढील रणधुमाळीसाठी सर्वजण सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या निवडीमुळे महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक शक्ती अधिक दृढ झाली असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची भक्कम कामगिरी होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl