महाबळेश्वरात विविध बौद्ध संघटनांच्या पुढाकाराने ६९ वा महापरिनिर्वाण दिन शांततेत साजरा

महाबळेश्वरात विविध बौद्ध संघटनांच्या पुढाकाराने ६९ वा महापरिनिर्वाण दिन शांततेत साजरा

महाबळेश्वर प्रतिनिधी : 

भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर, भीमक्रांती युवक संघटना तालुका महाबळेश्वर-मुंबई, नवतरुण बौद्ध विकास मंडळ, जयंती उत्सव कमिटी, समता सैनिक दल, श्रामनेर बौद्धचार्य संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ६९ वा महापरिनिर्वाण दिन महाबळेश्वरात श्रद्धाभावाने आणि अनुशासनपूर्वक साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना वंदन करण्यासाठी तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वरचे अध्यक्ष नितीन गायकवाड, कोषाध्यक्ष एकनाथ भालेराव, जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष कुमार शिंदे, भीमक्रांती युवक संघटना महाबळेश्वर-मुंबईचे अध्यक्ष संतोष भालेराव, नवतरुण बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष गौतम मोरे, जिल्हा पर्यटन सचिव आशा भालेराव, महिलाध्यक्षा नंदा यादव, संस्कार उपाध्यक्ष प्रकाश सपकाळ, पर्यटन उपाध्यक्ष आनंद खरात यांसह सिद्धार्थ यादव, संपत मोरे, लक्ष्मण मोरे, सचिन मोरे, रमेश मोरे, दशरथ मोरे, शशिकांत यादव, राजेश सपकाळ, बबन कदम, समता सैनिक भाग्यवान कदम, सतीश भालेराव, संदीप तांबे, सुमित कांबळे, साधू मोरे आदी मान्यवरांनी हजेरी लावली. समाजातील विविध घटकांतील महिलांची उपस्थितीदेखील लक्षणीय होती.

सूत्रसंचालन धोंडीबा पवार यांनी केले. कार्यक्रमादरम्यान सर्वांनी हा दिवस शांतता, बंधुता आणि समतेच्या संदेशासह साजरा करावा, असे आवाहन तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी केले. विचारमंथन, प्रार्थना आणि सामूहिक स्मरणांच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यातील समता सैनिकांनी मुंबई दादर येथील चैत्यभूमीवर सेवा देण्यासाठी उपस्थित राहून कर्तव्य बजावले. त्यांच्या या सेवेबद्दल तालुक्याच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl