महाबळेश्वरमध्ये उद्याचा आठवडा बाजार पूर्ववत; निवडणूक कार्यक्रमात बदलानंतर तहसीलदारांच्या सूचना
महाबळेश्वरमध्ये उद्याचा आठवडा बाजार पूर्ववत; निवडणूक कार्यक्रमात बदलानंतर तहसीलदारांच्या सूचना
✍️महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद निवडणूक 2025 संदर्भात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून उद्याचा आठवडा बाजार पूर्ववत सुरू राहणार असल्याची अधिकृत माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 डिसेंबर रोजी आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. मात्र राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणूक 2025 साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम निर्गमित केल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे.
त्यामुळे मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजीचा आठवडा बाजार कोणताही गोंधळ न होता नेहमीप्रमाणे सुरू राहील. व्यापारी, व्यावसायिक तसेच स्थानिक नागरिकांनी जुन्या निर्णयामुळे गैरसमज न ठेवता बाजारपेठ नेहमीच्या वेळेनुसार सुरू राहणार असल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाबळेश्वरचे तहसीलदार श्री. सचिन मस्के यांनी केले आहे.
निवडणुकीच्या बदलत्या कार्यक्रमामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ही सूचना जारी केली असून, नागरिकांनी सहकार्य राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. महाबळेश्वरमध्ये सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने प्रशासन सतर्क असून सर्व कामकाज पारदर्शक आणि सुरळीत ठेवण्यावर भर देत आहे.
Comments
Post a Comment