21 डिसेंबर रोजी महाबळेश्वर नगरपरिषदेची मतमोजणी; कडक सुरक्षा व वाहतूक निर्बंध लागू

21 डिसेंबर रोजी महाबळेश्वर नगरपरिषदेची मतमोजणी; कडक सुरक्षा व वाहतूक निर्बंध लागू

महाबळेश्वर प्रतिनिधी –

महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक–2025 अंतर्गत मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, महाबळेश्वर येथे मतमोजणीची सर्व व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया दोन फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे. यासाठी एकूण 10 मतमोजणी टेबलांची उभारणी करण्यात आली आहे.

मतमोजणी प्रक्रियेचे काम सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासनाकडून 2 रो अधिकारी, 10 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 20 मतमोजणी सहाय्यक अशा एकूण 32 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मतमोजणीशी संबंधित इतर अनुषंगिक कामकाजासाठी सुमारे 50 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रामध्ये केवळ उमेदवार, त्यांचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार असून ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी केंद्र व परिसरात मोबाईल वापरास संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मात्र, पत्रकारांना बातमी संकलनासाठी मोबाईल वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मतमोजणीदरम्यान वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने द महाबळेश्वर क्लब चौक, श्रेयस हॉटेल, केदार हॉटेल आणि आर.आर. हेरिटेज हॉटेल येथील मार्ग चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नगरपरिषद कार्यालय, पोस्ट ऑफिस आणि उदय हॉटेल या तीन ठिकाणांपासून केवळ उमेदवार, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी तसेच पत्रकार यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.

मतमोजणी प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी व संबंधितांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl