भिमक्रांती युवक संघटना, ता. महाबळेश्वर शाखा-मुंबई ची पुनर्बांधणी सभा संपन्न
🌿 भिमक्रांती युवक संघटना, ता. महाबळेश्वर शाखा-मुंबई ची पुनर्बांधणी सभा संपन्न
नवीन ११ सदस्यीय कार्यकारणी जाहीर, यशवंत मोरे अध्यक्ष तर रविंद्र गमरे महासचिव
✍️ मिलिंद काळे ,
महाबळेश्वर प्रतिनिधी –
नवी मुंबई (ता. ९ नोव्हेंबर २०२५) –
बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक न्याय आणि बौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या भिमक्रांती युवक संघटना, ता. महाबळेश्वर शाखा – मुंबई या संघटनेची पुनर्बांधणी बैठक तक्षशिला बुद्ध विहार, ऐरोली सेक्टर २, नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
ही सभा मुंबई शाखेचे अध्यक्ष सन्माननीय आयु. रविंद्र आनंदा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेच्या प्रारंभी मुंबई शाखेचे सचिव शरद कदम यांनी सूत्रसंचालन केले, तर उपसचिव रविंद्र गमरे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून अध्यक्षांची शिफारस केली, ज्यास उपस्थित सर्वांनी अनुमोदन दिले.
सभेस संघटनेचे संस्थापक व भा. बौ. म. सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक भालेराव साहेब, भा. बौ. म. ता. महाबळेश्वर अध्यक्ष नितीन गायकवाड, महासचिव अनिल सकपाळ, ता. अध्यक्ष संतोष भालेराव, मुंबई शाखेचे महासचिव भरत कदम, संस्कार उपाध्यक्ष संदीप मोरे, मार्गदर्शक रामचंद्र कदम तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
सभेत जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. संघटनेचे संस्थापक अशोक भालेराव यांनी संघटनेचे ध्येय, धोरणे आणि आगामी कामकाजाची दिशा स्पष्ट करून सर्व सदस्यांना एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन केले.
✳️ नवीन कार्यकारिणी (२०२५–२०२८)
१️⃣ प्रमुख मार्गदर्शक – रविंद्र आनंदा जाधव (कुमठे), रामचंद्र गेणू कदम (हटलोट)
२️⃣ अध्यक्ष – यशवंत विष्णू मोरे (रुळे)
३️⃣ महासचिव – रविंद्र राजाराम गमरे (आवळण)
४️⃣ कोषाध्यक्ष – विशाल लक्ष्मण जाधव (गावढोशी)
५️⃣ उपाध्यक्ष – क्रीडा विभाग – सतीश लक्ष्मण खरात (गावढोशी)
६️⃣ सचिव – अमोल विठ्ठल भालेराव (वेळापूर)
७️⃣ उपाध्यक्ष – सांस्कृतिक विभाग – किरण कोंडीराम कदम (खरोशी)
८️⃣ सचिव – विजय किसन सकपाळ (देवळी)
९️⃣ उपाध्यक्ष – शैक्षणिक विभाग – दिपक किसन कदम (कळमगाव)
🔟 सचिव/हिशोब तपासणीस – मयूर संपत सकपाळ (देवळी)
११️⃣ कार्याध्यक्ष – ज्ञानेश्वर दगडू कदम (हटलोट)
१२️⃣ प्रमुख निमंत्रक – शरद गेणू कदम (हटलोट)
१३️⃣ प्रमुख संघटक – विजय धर्माजी मोरे (पार)
ही ११ सदस्यीय कार्यकारिणी सर्वानुमते मान्य करण्यात आली.
सभा दरम्यान ता. अध्यक्ष संतोष भालेराव यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. जुने अध्यक्ष रविंद्र जाधव व महासचिव शरद कदम यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तर नवीन अध्यक्ष यशवंत मोरे आणि महासचिव रविंद्र गमरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी भरत कदम, संदीप मोरे, नितीन गायकवाड, अनिल सकपाळ यांनी नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
संस्थापक अशोक भालेराव साहेबांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून “संघटन हाच बळ, आणि बुद्धाचा मार्ग हाच आपला धर्ममार्ग” असे सांगत सामाजिक कार्याची दिशा दिली.
सभेचा समारोप सायंकाळी सहा वाजता झाला. शेवटी सर्वांनी “जय भीम” चा घोष देत नव्या अध्यायाला प्रारंभ केला.
Comments
Post a Comment