कास ग्रामस्थांकडून परिसराची स्वच्छता मोहीम; तळीरामांच्या पार्ट्या बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी..
कास ग्रामस्थांकडून परिसराची स्वच्छता मोहीम; तळीरामांच्या पार्ट्या बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी..
✍️सूर्यकांत पवार,
कास प्रतिनिधी
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठार परिसरात प्लास्टिकसह दारूच्या बाटल्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात झाला होता. विशेषतः कास तलाव परिसरात कचऱ्याचे साम्राज्य वाढले असून या परिसराची स्वच्छता कास गावातील लोकांकडून करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेसाठी सतीश किर्दत, नितीन सुर्वे, विकास किर्दत, रानू किर्दत, महेश शेलार, सुजीत जांभळे, विजय किर्दत, योगेश शेलार आदींसह कास ग्रामस्थ यांनी कचरा गोळा करण्यासाठी पुढाकार घेतला.
जागतिक वारसास्थळ असलेले कास पुष्प पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कासला येत असतात मात्र पठार पाहून झाल्यावर काही स्थानिक आणि बाहेरील पर्यटक येथे दारू, मटणाच्या पार्ट्या करून कास भकास करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कास ग्रामस्थांनी एकत्र येत कास स्वछता अभियान राबवत मोठ्याप्रमाणात कचरा, दारूच्या बाटल्या गोळा करत त्याची विल्हेवाट लावली.
सातारा पालिकेने कास परिसरात दररोज पालिकेचे स्वच्छता कर्मचारी नेमावेत आणि कास तलाव परिसराची स्वछता करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
कासमध्ये बाहेरील पर्यटक पर्यटनासाठी येतात मात्र सोबत मोठ्याप्रमाणात प्लास्टिकच्या वस्तू, दारूच्या बाटल्या इतरत्र टाकून परिसर दूषित करतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना सूचना फलकासोबत त्यांना स्वच्छतेचे मार्गदर्शन करणे गरजेचे असून येथे पार्टी करणाऱ्या तळीरामांना सातारा पोलिसांकडून चाप बसवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कास तलावात पर्यटकांसाठी नव्याने
फोटो - कास - कास परिसरात गोळा केलेल्या कचऱ्यासह कास ग्रामस्थ....
Comments
Post a Comment