या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ : गाईवर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ : गाईवर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
✍️ जितेंद्र करंडे,
प्रतापगड प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली आहे. पांगारी गावातील शेतकरी वसंत भाऊसाहेब पांगारे यांच्या गाईला मंगळवारी संध्याकाळी सहा च्या सुमारास बिबट्याने फस्त केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास वसंत पांगारे यांची गाय तायघाट – पांगारी हद्दीतील रानात चरायला गेली असता, बिबट्याने अचानक हल्ला चढवून ती फस्त केली. घटनेनंतर गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आणि वन विभागाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने जाणवत असून, ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या तरी वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये “वन विभाग झोपेत आहे का?” असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.
परिसरातील नागरिकांनी तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी केली.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “ या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत असूनही वन विभाग दुर्लक्ष करत राहतो. आम्हाला संरक्षण कोण देणार?” गावकऱ्यांच्या या प्रश्नाकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
🔹 ग्रामस्थांची मागणी:
- तातडीने पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे.
- वन विभागाने गस्त वाढवावी.
- पीडित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी.
या घटनेमुळे तायघाट, पांगारी, आणि भिलार परिसरातील शेतकरी आणि नागरिक रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास घाबरत आहेत.
वन विभागाने वेळेवर उपाययोजना कराव्यात.
Comments
Post a Comment