समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी ‘रक्षक प्रतिष्ठान’ सदैव तत्पर — सुशीलदादा मोझर

 समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्यासाठी ‘रक्षक प्रतिष्ठान’ सदैव तत्पर — सुशीलदादा मोझर

✍️  सचिन भिलारे , 

भिलार प्रतिनिधी —

उडतरे (ता. वाई) :
सामाजिक न्याय, नागरिकांचे प्रश्न आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करणारी संस्था म्हणून ‘रक्षक प्रतिष्ठान’ नेहमीच अग्रस्थानी राहील, असा निर्धार रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांनी व्यक्त केला.

उडतरे (ता. वाई) येथे रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी रक्षक प्रतिष्ठान शाखेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे विविध जिल्हास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना सुशीलदादा मोझर म्हणाले,

“खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रक्षक प्रतिष्ठान’ समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्यरत आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि गरजू जनतेच्या अडचणी सोडवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. तसेच, समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना योग्य नोकरी मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक पदाधिकाऱ्याने लोकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहून त्या सोडवण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे.”

समारंभात सातारा जिल्हाध्यक्ष दस्तगीरभाई बागवान, मनोजभाऊ माळी, सातारा शहराध्यक्ष महेशभाऊ ठोंबरे, तन्वीर शेख, सांगली जिल्हाध्यक्ष विशाल पवार, जिल्हा संघटक सुशील जाधव, तसेच उडतरे शाखा प्रमुख अथर्व पवार, उपाध्यक्ष संकेत पवार, विघ्नेश पवार, संदेश पवार, स्वप्नील पवार, दत्तात्रय पवार, शैलेश बाबर, रूपेश जगताप, प्रज्वल बाबर यांच्यासह सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत, समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

🔸 ‘रक्षक प्रतिष्ठान’ समाजासाठी नवा विश्वास — नवी दिशा! 🔸

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl