आपल्या घराच्या चाव्या भाडेकरूच्या हातात देऊ नका! – महाबळेश्वरमध्ये नागरिकांचा यलगार

आपल्या घराच्या चाव्या भाडेकरूच्या हातात देऊ नका! – महाबळेश्वरमध्ये नागरिकांचा यलगार 

✍️ मिलिंद काळे, 

महाबळेश्वर प्रतिनिधी

महाबळेश्वर : आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांचा एकत्रित मेळावा पार पडला. शहरातील खुल्या आरक्षणावर झालेल्या या चर्चासत्रात महाबळेश्वरच्या भविष्यासंदर्भात उत्साहपूर्ण वादविवाद रंगले. गेल्या आठ वर्षांतील अपूर्ण विकासकामे, वाढीव कर, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि स्थानिक व्यावसायिकांच्या अडचणी या मुद्द्यांवर नागरिकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

बैठकीत चर्चेदरम्यान सर्वानुमते माजी नगराध्यक्षांच्या नावावर उमेदवारीसंदर्भात शिक्कामोर्तब झाले. नागरिकांनी मागील कार्यकाळाचा आढावा घेत, विकासाचा वेग मंदावल्याची तक्रार केली. विशेष म्हणजे, “महाबळेश्वर हे आपले घर आहे, आणि आपल्या घराच्या चाव्या भाडेकरूंच्या हातात देऊ नका,” असे ठाम विधान लोकमित्र जनसेवा आघाडीचे नेते राजेश कुंभारदरे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित नागरिकांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.

यावेळी चर्चेत राजेश कुंभारदरे आणि डी.एम. बावळेकर यांच्या नावांची उमेदवारीसाठी चर्चा झाली होती. मात्र, शेवटी डी.एम. बावळेकर यांचे नाव अंतिम झाले असल्याची माहिती समोर आली. तथापि, मंत्री मकरंद पाटील यांनी आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतरही, जर योग्य समन्वय झाला नाही, तर स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या निर्णायक बैठकीत आघाडीचा अधिकृत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीचा तापमान आणखी वाढले आहे.

स्थानिकांनी व्यक्त केलेली नाराजी, जनतेत वाढलेला असंतोष आणि सर्व पक्षीय एकत्रीकरण यामुळे या वेळीची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
महाबळेश्वरच्या हितासाठी “स्वतःच्या घराचा कारभार स्वतःच्या हाती” ठेवण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला असून, स्थानिक नागरिक आता सक्रियपणे निवडणुकीत भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl