तळदेव येथे ‘नाम फाऊंडेशन’, ‘कोयना एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘स्वराज्य फाऊंडेशन’तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर

तळदेव येथे ‘नाम फाऊंडेशन’, ‘कोयना एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘स्वराज्य फाऊंडेशन’तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिर
पुणे येथील ए.ओ.आय. व लाईफ पॉईंट हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर करणार तपासणी

प्रतापगड  प्रतिनिधी :

समाजातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘नाम फाऊंडेशन’, ‘कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव’ आणि ‘स्वराज्य फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी एक भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर इलाबेन मेहता विद्यालय, तळदेव येथे सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे.

या आरोग्य शिबिरासाठी पुणे येथील ए.ओ.आय. आणि लाईफ पॉईंट हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभणार आहे. शिबिरामध्ये कान-नाक-घसा (ENT) तपासणी, कर्करोग व ॲन्को तपासणी, हृदयरोग निदान, हाडांचे आजार, डोळ्यांची तपासणी तसेच इतर सर्वसामान्य आजारांवर तज्ञांकडून मोफत तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहेत.

शिबिरात तपासणीदरम्यान काही गंभीर आजार आढळल्यास संबंधित रुग्णांना पुणे येथे पुढील उपचार अथवा आवश्यक शस्त्रक्रिया नाम फाऊंडेशन आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील सर्व १०५ गावांतील नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेबद्दल जागरूकता निर्माण करण्यास आणि उपचार सुलभ करण्यास या शिबिरातून मोठा हातभार लागेल, असा विश्वास आयोजक संस्थांनी व्यक्त केला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – ९५७९०४०३५६५ / ७५८८२०२०१७ / ९८६९७७३२९९.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl