भीमक्रांती युवक संघटनेच्या मुंबई शाखेला नवी कार्यकारिणीअध्यक्षपदी यशवंत मोरे यांची सर्वानुमते निवड
भीमक्रांती युवक संघटनेच्या मुंबई शाखेला नवी कार्यकारिणी
अध्यक्षपदी यशवंत मोरे यांची सर्वानुमते निवड
✍️अनिल वीर,
सातारा प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुका – भीमक्रांती युवक संघटनेच्या मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी यशवंत विष्णू मोरे (रुळे) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षस्थानी नुकतीच बैठक पार पडली. संघटनेच्या आगामी कामकाजात नवीन ऊर्जेचा संचार व्हावा, युवा वर्गाला संघटनेत अधिक प्रभावीपणे जोडण्याकरिता सक्षम नेतृत्व म्हणून यशवंत मोरे यांचे नाव निश्चित करण्यात आले.
बैठकीत संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे –
- महासचिव: रविंद्र राजाराम गमरे (आवळण)
- कोषाध्यक्ष/खजिनदार: विशाल लक्ष्मण जाधव (गावढोशी)
- उपाध्यक्ष (क्रीडा विभाग): सतीश लक्ष्मण खरात (गावढोशी)
- सचिव: अमोल विठ्ठल भालेराव (वेळापूर)
- उपाध्यक्ष (सांस्कृतिक विभाग): किरण कोंडीराम कदम (खरोशी)
- सचिव: विजय किसन सकपाळ (देवळी)
- उपाध्यक्ष (शैक्षणिक विभाग): दिपक किसन कदम (कळमगाव)
- सचिव/हिशोब तपासणीस: मयूर संपत सकपाळ (देवळी)
- कार्याध्यक्ष: ज्ञानेश्वर दगडू कदम (हातलोट)
- प्रमुख संघटक: विजय धर्माजी मोरे (पार)
नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल अध्यक्ष संतोष भालेराव, भरत कदम, संदीप मोरे, शुभम कदम, शैलेश कदम, नितीन गायकवाड, अनिल सकपाळ, अशोक भालेराव यांनी अभिनंदन व्यक्त केले. संघटनेचे उद्दिष्ट सामाजिक बांधिलकी, युवक संघटन, तसेच शैक्षणिक-सांस्कृतिक प्रगतीच्या माध्यमातून समाज उन्नती साधणे हे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नवनिर्वाचित अध्यक्ष यशवंत मोरे यांचा सत्कार करताना अशोक भालेराव व शेजारी उपस्थित मान्यवर.
Comments
Post a Comment