शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश धनवडे यांचा विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा मुख्याध्यापक मोतलिंग सर यांचा बदलीनिमित्त निरोप समारंभ उत्साहात पार

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश धनवडे यांचा विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा
मुख्याध्यापक मोतलिंग सर यांचा जिल्हाअंतर्गत बदलीनिमित्त निरोप समारंभ उत्साहात पार


✍️ श्रीक्षेत्र महाबळेश्वर प्रतिनिधी – 

श्रीक्षेत्र महाबळेश्वर – सामाजिक बांधिलकी व शैक्षणिक जाणीव जोपासत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश धनवडे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांनी वाढदिवसाचा दिवस अर्थपूर्ण केला. विद्यार्थ्यांच्या आनंदमय चेहऱ्यांमुळे संपूर्ण शाळा परिसर उत्साहाने भरून गेला.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी धनवडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची प्रशंसा केली. “शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे धनवडे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमानंतर श्रीक्षेत्र महाबळेश्वर शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोतलिंग सर यांचा जिल्हाअंतर्गत बदलीनिमित्त निरोप समारंभ उत्साहात पार पडला. त्यांची बदली शेंदुर्णी येथे झाल्याने शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्याकडून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. शाळेतील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि शिस्तबद्ध वातावरण घडविण्यासाठी दिलेले योगदान सर्वांनी कौतुकपूर्वक स्मरले.

या कार्यक्रमाला श्रीक्षेत्र महाबळेश्वरचे सरपंच सुनील बिरामणे, अर्बन बँकेचे संचालक प्रशांत कात्रट, उपसरपंच अनिल कात्रट, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नाना वाडेकर, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ पवार, मा. उपसरपंच प्रदीप कात्रट, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय कांबळे, तसेच श्रीक्षेत्र मावशी ग्रामसेवक प्रशांत रणपिसे उपस्थित होते.

याशिवाय राजेंद्र पुजारी, राहुल कदम, रवींद्र शिर्के, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नवनियुक्त मुख्याध्यापिका ज्योती कदम मॅडम, हजारे सर, रवी सर यांनी देखील या समारंभात सहभाग घेतला. सर्व मान्यवरांनी मोतलिंग सर यांचा शैक्षणिक कार्याचा गौरव करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

मोतलिंग सर यांनी आपल्या निरोपप्रसंगी भावनिक शब्दांत सर्वांचे आभार मानत सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा आहे. या शाळेत घालवलेले क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय राहतील.”

कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवर्गाने संयुक्तरित्या केले. सूत्रसंचालन शिक्षकांनी केले, तर आभारप्रदर्शन समिती सदस्यांनी मान्यवरांचे केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीने हा वाढदिवस व निरोप समारंभ संस्मरणीय ठरला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl