मेढा येथे मध्यरात्री अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली एपीआय सुधीर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली



मेढा येथे मध्यरात्री अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

एपीआय सुधीर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन  पाहणी केली 

✍️रवी चव्हाण,

मेढा प्रतिनिधी —
मेढा येथे मंगळवार रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली आहे. वेण्णा चौक परिसरात उभ्या असलेल्या मॅक्सिमो वाहनास मागून भरधाव वेगात येणाऱ्या श्री कन्स्ट्रक्शनच्या डंपरने जोरदार धडक दिल्याने मोठा आवाज होत परिसरात क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्राथमिक माहितीनुसार, रात्री सुमारे ११.४५ वाजता डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपरने वेण्णा चौकातील दुभाजक कट्टा तोडला आणि डाव्या बाजूला उभ्या असलेल्या मॅक्सिमोवर जाऊन आदळला. या धडकेत मॅक्सिमोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच मेढा पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सुधीर पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली तसेच उपस्थित नागरिकांकडून सविस्तर माहिती घेतली. संबंधित डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास एपीआय सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

घटनास्थळी झालेल्या पोलिसांच्या वेळीच केलेल्या हालचालीमुळे वाहतुकीवरील अडथळा तात्काळ दूर करण्यात आला. अपघातानंतर रात्रभर परिसरात या घटनेची चर्चा रंगली. स्थानिक पोलिसांनी वाहनचालकांना वेगमर्यादा पाळण्याचे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

 प्रतिनिधी – रवी चव्हाण



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl