सायगावमध्ये आज मर्ढेकर मराठी साहित्य संमेलननवकाव्य चळवळीचा जागर उत्सवमय वातावरणात

सायगावमध्ये आज मर्ढेकर मराठी साहित्य संमेलन
नवकाव्य चळवळीचा जागर उत्सवमय वातावरणात

प्रतिनिधी – सायगाव (ता. जावळी)

कोयना एज्युकेशन सोसायटी तडदेव संचलित लोहिया विद्यालय व ज्युनियर कॉलेज, सायगाव यांच्या वतीने आज, गुरुवार दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी “कवीवर्य बा. सी. मर्ढेकर मराठी साहित्य संमेलन” मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मराठी नवकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी आयोजित होणाऱ्या या संमेलनात साहित्य, कविता आणि संवाद यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन आज सकाळी १०.३० वाजता होईल. उद्घाटक म्हणून श्री. विनोद कुलकर्णी (९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे समन्वय कार्याध्यक्ष) उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे अध्यक्षस्थान श्री. निलेश महिगावकर (युवा साहित्यिक व विपुल लेखक) भूषवतील, तर स्वागताध्यक्ष म्हणून श्री. अजित आपटे (सुप्रसिद्ध कवी, समाजसेवक व शाखा समिती अध्यक्ष) सहभागी होतील.

प्रमुख उपस्थितीत श्री. किसनदादा जाधव (अध्यक्ष, कोयना एज्यु. सोसायटी, तडदेव), श्री. डी. के. जाधव (सचिव, कोयना एज्यु. सोसायटी, तडदेव), तसेच श्री. अजित जाधव (कवी व पत्रकार) यांचा समावेश आहे. संस्थेच्या संचालक मंडळाचे सर्व सदस्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १२ वाजता भाषादालन उद्घाटन व पुस्तक प्रदर्शन या उपक्रमाचा शुभारंभ होईल. तर दुपारी २ वाजता परिसंवाद आणि काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
परिसंवादाचे अध्यक्ष श्री. निरंजन फटाां (प्रख्यात युवा वक्ते) असतील. "मर्ढेकर यांची कविता" या विषयावर श्री. निलेश महिगावकर विवेचन करतील. यावेळी अदिती कानवेळ, सावित्री जगदाळे आदी साहित्यिक सहभाग घेतील.

दुपारी होणाऱ्या काव्यसंमेलनाचे अध्यक्ष श्री. विलास पिसाळ असून, काव्यवाचनात श्री. कांत भोसले, अदिती कानवेळ, सप्नजा लोंढे, अनिता जाधव, अजित साळुंखे, प्रा. जनार्दन पिसाळ, विठ्ठल घाडगे, रवी गावड, उमेश सपकाळ यांचा सहभाग राहणार आहे.

कार्यक्रमाचे नियोजन  श्री. पी. टी. खाडे (सर) यांनी केले आहे. तर प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच श्री. संतोष भोसले आणि श्री. वैभव वसागडे (शाळा व्यवस्थापन समिती) यांच्या प्रयत्नातून संमेलनाची भव्य तयारी करण्यात आली आहे.

सायगाव परिसरात आजचा हा कार्यक्रम साहित्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार असून, मराठी नवकाव्य परंपरेला नवी दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl