काँग्रेस मजबूत करण्याचा निर्धार : जिल्हा प्रभारी पृथ्वीराज साठे यांचे स्पष्ट संकेत“आघाडीपेक्षा काँग्रेस मजबूत करणे हेच मूळ उद्दिष्ट”
काँग्रेस मजबूत करण्याचा निर्धार : जिल्हा प्रभारी पृथ्वीराज साठे यांचे स्पष्ट संकेत
“आघाडीपेक्षा काँग्रेस मजबूत करणे हेच मूळ उद्दिष्ट”
✍️ प्रकाश कदम ,
पोलादपूर प्रतिनिधी –
सातारा, दि. २ :
“काँग्रेस पक्ष मजबूत करणे हेच आपले मूळ उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा विचार करून आघाडीबाबतचा निर्णयही याच तत्त्वावर घेतला जाईल,” असे स्पष्ट मत जिल्हा प्रभारी पृथ्वीराज साठे यांनी व्यक्त केले.
आज सातारा येथील काँग्रेस भवनात जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, विधानसभांचे निरीक्षक, तसेच महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांची उपस्थिती होती.
बैठकीत जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची संघटनात्मक तयारी, तालुका स्तरावरील कामकाज, तसेच जनतेशी संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रभारी साठे यांनी प्रत्येक तालुक्याची राजकीय स्थिती जाणून घेत कार्यकर्त्यांना पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले.
या वेळी स्वर्गीय डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा महिला काँग्रेसने सुरू केलेल्या साखळी उपोषणास सर्व मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
या कार्यक्रमास महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, जाकीर पठाण, भानुदास माळी, बाबासाहेब कदम, अमरजीत कांबळे, धैर्यशील सुपले, प्रा. सदाशिव खाडे, ऍड. श्रीकांत चव्हाण, रजनीताई पवार, संजय तडाके, अजित कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच कोरेगावचे उमेश खंदारे, वाईचे यासीन शेख, माणचे नंदकुमार शेळके, कराड उत्तर-दक्षिणचे संजय बालगुडे, पाटणचे सचिन आडेकर, सातारा तालुका निरीक्षक सौ. शौनी नौशाद, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुषमा राजे घोरपडे यांच्यासह इंद्रजीत चव्हाण, आनंदराव जाधव, गजानन नावडकर, डॉ. संतोष कदम, नामदेवराव पाटील, ऍड. अमित जाधव, जयदीप शिंदे, प्रतापराव देशमुख, अमर करंजे, प्राची ताकतोंडे, मंजिरी पानसे, धनश्री मालुसरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचा समारोप धैर्यशील सुपले यांनी आभार प्रदर्शनाने केला.
सातारा जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक पुनर्बांधणी आणि आगामी निवडणुकांची तयारी यावर भर देत प्रभारी पृथ्वीराज साठे यांनी “काँग्रेसच्या विचारधारेवर निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षाला नवसंजीवनी द्यावी,” असे आवाहन केले.
Comments
Post a Comment