महाबळेश्वर नगरपालिका निवडणुका : कोण कोण आहेत इच्छुक कोणत्या कोणत्या प्रभागा मधून

🗳️ महाबळेश्वर नगरपालिका निवडणुका : कोण कोण आहेत इच्छुक कोणत्या कोणत्या प्रभागा मधून


✍️ जितेंद्र करंडे, 

प्रतापगड प्रतिनिधी

महाबळेश्वर – थंड हवेचे आणि निसर्गसौंदर्याने नटलेले महाबळेश्वर सध्या राजकीय उष्णतेने तापले आहे. येत्या महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुका जवळ येताच उमेदवारांची धावपळ, गट-राजकारण, चर्चांचा पाऊस, आणि मतदारसंघात सुरू झालेल्या बैठका यामुळे शहरात निवडणूक रंगू लागली आहे.

एक नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवक अशा एकूण 21 जागांसाठी इच्छुकांची लगबग सुरु झाली आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे – नगराध्यक्ष पदाची थेट जनतेतून निवडणूक. त्यामुळे प्रत्येक मतदाराला तीन मतांचा हक्क मिळणार आहे — दोन नगरसेवकांसाठी आणि एक नगराध्यक्षासाठी. या बदलामुळे नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता, तर नेत्यांमध्ये गोंधळ दिसत आहे.


🔹 प्रभागनिहाय उमेदवारांची चर्चेतली नावे

प्रभाग १ :

सर्वसाधारण गटासाठी माजी नगराध्यक्ष युसुफ शेख, शंकर ढेबे, आजर बडाने, राजू नालबंद आणि सुनील आखाडे यांची नावे जोरात चर्चेत आहेत.
सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी विद्या शरद बावळेकर, आशा सुनिल ढेबे, आणि झीनत याकुब चौगुले या महिलांची नावं आघाडीवर आहेत.

प्रभाग २ :

ओबीसी सर्वसाधारण गटातून प्रशांत आखाडे, सत्तार बडाने, किरण काळे, रवी कुंभारदरे, आणि संतोष आखाडे हे संभाव्य उमेदवार चर्चेत आहेत.
महिला आरक्षणासाठी संगीता दत्तात्रय वाडकर, सोनाली रोहित बांदल, आणि शांता सुरेश आखाडे या इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.

प्रभाग ३ :

महिला आरक्षणासाठी विमलताई पार्टे, ज्योतीताई वाघदरे, आणि पूजा उतेकर,
तर सर्वसाधारण गटातून विशाल तोष्णीवाल, रवींद्र कुंभारदरे, हेमंत साळवी, आणि प्रवीण जिमन यांच्या नावांची चर्चा आहे.

प्रभाग ४ :

अनुसूचित जाती आरक्षणासाठी विलास काळे, आकाश साळुंखे, कुमार शिंदे, ऋषी वायदंडे, आणि उमेश रोकडे हे इच्छुक चर्चेत आहेत.
महिला आरक्षणातून विमलताई ओंबळे, वंदना गणेश ढेबे, तसेच विमल ताई बिरामणे  यांची नावे पुढे आली आहेत.

प्रभाग ५ :

महिला आरक्षणासाठी अपर्णा सलागरे, प्रभा विजय नायडू , स्मिता सुनील पाटील ,
तर सर्वसाधारण गटातून संजय जंगम, सुनील साळुंखे, आणि सैफ सज्जाद वारुणकर यांच्या नावांची चर्चा आहे.

प्रभाग ६ :

सर्वसाधारण आरक्षणासाठी गणेश सपकाळ, आबा शिंदे, दुर्वेश प्रभाळे, सचिन शिर्के, समीर सुतार,
तर एसटी महिला आरक्षणासाठी उषा कोंडके, निता आकाश झाडे, आणि सौ. खामकर यांच्या नावांची चर्चा आहे.

प्रभाग ७ :

सर्वसाधारण गटातून नासिर मुलानी, सलीम बागवान, आणि इकबाल वलगे या नावांवर चर्चेची हवा आहे.
ओबीसी महिला आरक्षणातून अफजल वलगे आणि अल्ताफ मानकर यांच्या पत्नींची नावे चर्चेत आहेत.

प्रभाग ८ :

सर्वसाधारण आरक्षणासाठी बंडूशेठ कुंभारदरे, राहुल पिसाळ, आणि मुबारक शेख,
तर अनुसूचित जाती महिला आरक्षणातून स्वप्नाली कुमार शिंदे माजी नगराध्यक्ष, उषा गोरख शिंदे स्नेहा आकाश साळुंखे  यांच्या नावे जोरात चर्चेत आहेत.

प्रभाग ९ :

ओबीसी महिला आरक्षणासाठी संगीता प्रकाश हिरवे, आफरीन वरुणकर, रेश्मा किरण ढेबे, आणि संगीता गोंदकर या इच्छुकांची नावे चर्चेत आहेत.
सर्वसाधारण आरक्षणासाठी अफजल सुतार, मोजम नालबंद, आणि आशिष चोरगे यांची चर्चा सुरू आहे.

प्रभाग १० :

सर्वसाधारण गटातून रोहित ढेबे, मनीष मोहिते, आणि संदीप कोंढाळकर या तिघांची नावे समोर आली आहेत.
ओबीसी महिला आरक्षणातून नीलम गणेश आखाडे, सुनिता संदीप आखाडे, अश्विनी अशोक ढेबे, आणि सुनिता दत्तात्रय ढेबे यांची नावे पुढे आहेत.


🏛️ नगराध्यक्ष पदासाठी चुरस सुरूच

नगराध्यक्ष पदासाठी कुमार शिंदे, डी.एम. बावळेकर, नासिर मुलानी, आणि सुनील शिंदे या नावांभोवती मोठी चर्चा रंगत आहे.
कोण कोणत्या पक्षातून उमेदवारी स्वीकारणार, कोण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार — याबाबत अजूनही राजकीय गणिते आखली जात आहेत.

काही नेते आपला पक्ष निश्चित करून संघटनात्मक तयारी करत आहेत, तर काही “तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून लढू” असा पवित्रा घेत आहेत.


⚖️ गटबाजी, रणनीती आणि समीकरणांची जुळवाजुळव

महाबळेश्वरच्या राजकारणात परंपरेने गटबाजीची परंपरा आहे. काही ठिकाणी गावनिहाय समीकरणे, तर काही ठिकाणी जातीय आणि वैयक्तिक संबंध निर्णायक ठरताना दिसत आहेत.
पक्षीय गटांमध्ये नेत्यांचे अंतर्गत मतभेदही वाढले असून, उमेदवारी ठरविताना काही ठिकाणी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते.

राजकीय निरीक्षकांच्या मते, “या निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्तिमत्व आणि जनसंपर्क जास्त महत्त्वाचा घटक ठरणार आहे.”


🗳️ मतदारांचा मूड आणि आगामी चित्र

महाबळेश्वर हे पर्यटननगरी असले तरी येथील मतदार स्थानिक समस्यांबद्दल सजग आहेत. पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, बाजारातील वाहतूक कोंडी, आणि पर्यटन व्यवस्थापन या मुद्द्यांवर मतदार नाराजी व्यक्त करत आहेत.
प्रत्येक उमेदवार आता या मुद्द्यांवर प्रचाराची दिशा ठरवतोय.

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीत यंदा चुरशीची लढत निश्चित झाली आहे.
राजकीय समीकरणे दररोज बदलत असताना, कोण कुणासोबत आणि कोणाविरुद्ध, हेच पाहणे आता सर्वांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे.
मतदारांच्या मनातील गणिते आणि उमेदवारांच्या जुळलेल्या गटांचीच ही निवडणूक ठरणार आहे — थंड हवेच्या शहरात सध्या मात्र राजकीय उष्णता चरमसीमेवर आहे! 🔥


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl