बोपर्डी, ता. वाई – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बचतगट प्रशिक्षण व पशुधन कार्यमोहीम शिबिराचा भव्य शुभारंभ

बोपर्डी, ता. वाई – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बचतगट प्रशिक्षण व पशुधन कार्यमोहीम शिबिराचा भव्य शुभारंभ

वाई प्रतिनिधी–

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची गती वाढविण्यासाठी बोपर्डी (ता. वाई) ग्रामपंचायतीतून दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ गुरुवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. महिलांच्या सबलीकरणासाठी बचतगटांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे आणि पशुपालकांच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजांसाठी पशुधन कार्यमोहीम राबविणे हे या उपक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट राहिले.

कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत सभागृहात बचतगट प्रशिक्षण उपक्रमाच्या उद्घाटनाने झाली. हा उपक्रम वाई पंचायत समितीचे सन्माननीय गटविकास अधिकारी मा. विजयकुमार परीट यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. यावेळी बोपर्डी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मा. शंकर (बापू) गाढवे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. शंकर चिकटूल, गावातील लोकप्रतिनिधी, महिला ग्रामस्थ, बचतगट अध्यक्ष, सचिव, सभासद तसेच सिआरपी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बचतगट प्रशिक्षण सत्रात महिलांना व्यवसाय, आर्थिक सक्षमीकरण, सूक्ष्म उद्यमशिलता, आणि योजनांचा प्रभावी वापर या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती देत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यापूर्वी पशुधन दवाखान्यातील पशुधन कार्यमोहीम शिबिराचे उद्घाटन देखील मा. गटविकास अधिकारी परीट यांच्या हस्ते झाले. यावेळी पशुधनविषयक रोगप्रतिबंधक उपाय, जनावरांचे पोषण, स्वच्छता, योजनांचा लाभ आणि आधुनिक पशुपालन पद्धतीविषयी डॉ. डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सत्राचा लाभ घेतला.

या दोन्ही उपक्रमांविषयी प्रशंसोद्गार काढताना मा. गटविकास अधिकारी यांनी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, ग्रामपंचायतीचे प्रयत्न, स्वच्छतेबाबतची जागरूकता आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे बोपर्डी गाव निश्चितच नावारूपाला येण्यासाठी वेळ लागणार नाही,” असे मत त्यांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत सरपंच मा. शंकर (बापू) गाढवे यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचतगट तसेच गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

हे उपक्रम ग्रामीण विकासाला चालना देणारे ठरतील, असा विश्वास व्यक्त होत असून बोपर्डी ग्रामपंचायतीची विकासयात्रा अधिक वेगाने पुढे जाण्यास मदत करणार आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl