महाबळेश्वर तालुक्यातील अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसानपंचनामे करण्याचे ना. मकरंद पाटील यांचे आदेश; शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट



🌧️ महाबळेश्वर तालुक्यातील अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान

पंचनामे करण्याचे ना. मकरंद पाटील यांचे आदेश; शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट

✍️ जितेंद्र कारंडे, 

प्रतापगड प्रतिनिधी – 

महाबळेश्वर दि. २ :
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भात, वरी, नाचणी, वाटाणा या खरीप पिकांसह स्ट्रॉबेरीच्या लागवडीवर देखील पावसाचा तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील यांनी अधिकाऱ्यांना तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

ही माहिती पंचायत समितीचे माजी सभापती संजयबाबा गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, तसेच बाबूदादा संकपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

तालुक्यातील अनेक भागांत सततच्या पावसामुळे नुकतीच कापणी केलेली भात, वरी, नाचणी ही पिके शेतातच भिजून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कोयना, सोळशी, कांदाटी , वाळण, आणि जावली सीमेवरील गावांमध्ये नुकसानाचे प्रमाण विशेषतः गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

महाबळेश्वरची ओळख असलेल्या लालबुडूक स्ट्रॉबेरीच्या नव्या लागवडीवरही या अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली असून आगामी हंगामाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, शेतकऱ्यांना शक्य ती मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे,माजी सभापती संजयबाबा गायकवाड,  आणि बाबूराव संकपाळ यांनी प्रशासनाला तातडीने प्रत्यक्ष नुकसान पाहणी करून पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले आहे.


थोडक्यात मुद्दे :

  • अवकाळी पावसामुळे भात, वरी, नाचणी, वाटाणा, स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम
  • मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे पंचनाम्याचे आदेश
  • स्थानिक नेत्यांचा शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीचा आग्रह


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl